आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानची नवी गर्लफ्रेंड?:सलमान खानसोबतच्या रिलेशनशिपच्या वृत्तांवर सामंथा लॉकवुडने सोडले मौन, म्हणाली - ते माझे मित्र आणि खूप चांगले व्यक्ती

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खान आणि सामंथा लॉकवुड हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'शूट द हिरो' चित्रपटाची अभिनेत्री सामंथा लॉकवुडने सलमानसोबतच्या तिच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. सलमान खान तिचा चांगला मित्र आणि चांगला व्यक्ती असल्याचे तिने सांगितले आहे.

सलमान खानची 'न्यू गर्लफ्रेंड' म्हणून संबोधले जात असल्याच्या वृत्तावर सामंथा लॉकवुड म्हणाली, 'मला वाटते की, लोक खूप बोलतात. मला हे देखील वाटते की, काही नसतानाही लोक बोलतात. मी सलमानला भेटले आहे, ते माझे चांगले मित्र आहेत आणि खूप चांगले व्यक्ती आहेत. याविषयी बोलण्यासाठी एवढेच आहे. मला हे समजत नाही की, लोकांना एवढे आयडिया कुठून मिळतात'

'सुलतान' हा सामंथाचा आवडता बॉलिवूड चित्रपट
सामंथा लॉकवूड पुढे म्हणाली, "मी सलमानच्या आधी हृतिक रोशनला भेटले होते. पण, हृतिक आणि माझ्याबद्दल कोणीही काहीही बोलले नाही. त्यामुळे हे रिपोर्ट्स कुठून येत आहेत हे मला माहीत नाही." मुलाखतीदरम्यान सामंथा लॉकवुडने असेही सांगितले की, सलमानचा 'सुलतान' हा तिचा आवडता बॉलिवूड चित्रपट आहे.

सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीत आली होती सामंथा
सामंथा लॉकवुडने गेल्या महिन्यात सलमान खानच्या पनवेल फार्म हाऊसवर त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीबद्दल बोलताना सामंथा म्हणाली की, तिने पार्टीतून सलमानला फक्त जाणुन घेतले. मात्र, यापूर्वीही ती 2-3 वेळा सलमानला भेटली आहे. त्यामुळे इंडस्ट्रीत ती फक्त सलमानलाच ओळखत होती. सामंथाने असेही सांगितले की, ती सलमानच्या वाढदिवसाच्या पार्टीत इतर अनेक लोकांना जाणून घेतले. बर्थडे पार्टीपूर्वी, सामंथा जयपूरमधील एका सोशल इव्हेटमध्ये सलमान खान आणि शिल्पा शेट्टीसोबत दिसली होती.

समंथा हृतिकला भेटली
गेल्या महिन्यात सामंथा मुंबईत आली तेव्हा तिने हृतिक रोशनचीही भेट घेतली. त्यानंतर तिने सोशल मीडियावर 'ग्रीक गॉड' हृतिकला भेटतानाचे फोटो शेअर केले आणि लिहिले, "फिल्मी कुटुंबातून आलेल्या या अभिनेत्याची मजेदार भेट. ज्याला अॅक्शन आवडते - सुपरस्टार हृतिक रोशन."

बातम्या आणखी आहेत...