आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त लक्झरी लाइफसाठी देखील ओळखली जाते. अलीकडेच ती तिच्या नवीन घरामुळे चर्चेत आहे. सामंथाने हैदराबादमध्ये नवीन घर खरेदी केल्याचे वृत्त आहे. या घराची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अद्याप सामंथाने याची पुष्टी केलेली नाही.
खरेदी केला थ्री बीएचके फ्लॅट
इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, सामंथाने हैदराबादमध्ये एक आलिशान 3 बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. तिचे हे नवीन घर 'जयभेरी ऑरेंज काउंटी' या परिसरात आहे. अभिनेत्रीने हा फ्लॅट तब्बल 7.8 कोटी रुपयांना विकत घेतल्याचे बोलले जात आहे. रिअल इस्टेट डेट अॅनालिटिक्स फर्म CRE मॅट्रिक्सच्या मते, या आलिशान फ्लॅटमध्ये 6 पार्किंग स्लॉट आहेत. तसेच हा फ्लॅट समुद्राच्या अगदी समोर आहे.
सामंथाने मुंबईतही खरेदी केला 15 कोटींचा फ्लॅट
याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात सामंथाने मुंबईतही एक अपार्टमेंट विकत घेतल्याचे म्हटले जाते. मुंबईतील तिच्या घराची किंमत तब्बल 15 कोटी रुपये इतकी आहे. याशिवाय तिचे जुबली हिल्समध्ये 100 कोटींचे आलिशान घर आहे. येथे ती तिचा पुर्वाश्रमीचा पती नागा चैतन्यसोबत राहत होती. नागाचे नाव आता अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत जोडले जात आहे.
नागा चैतन्यसोबतच्या नात्यावर शोभिताने मौन सोडले
नागा चैतन्य आणि शोभिता रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. या अफवांवर शोभिताने 'पोन्नियन सेल्वन'च्या प्रमोशनदरम्यान सांगितले होते की, 'मी सध्या फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. मला चांगले चित्रपट करायचे आहेत. माझ्या आयुष्याबाबत सुरू असलेल्या अफवांची मला पर्वा नाही. मी काहीही चुकीचे केलेले नाही त्यामुळे घाबरण्याचे काही नाही.'
ती पुढे म्हणाली, 'ही माझी वैयक्तिक निवड आहे. माझ्या आयुष्यात काय घडत आहे हे मला स्पष्ट करण्याची गरज नाही. मला माझ्या आयुष्याबद्दल स्पष्टपणे बोलण्याची गरज नाही,' असेही ती म्हणाली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.