आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीने सोडले मौन:नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटावर सामंथा रुथ प्रभू म्हणाली - 'मला काहीही विसरायचे नाही'

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू सध्या तिच्या आगामी 'शाकुंतलम' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने तिने नुकतीच एका वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी सामंथा म्हणाली की, ती तिच्या आयुष्यातून खूप काही शिकली आहे आणि तिला तिचा भूतकाळ विसरायचा नाही. 'शाकुंतलम' या चित्रपटात सामंथाना शकुंतलेची भूमिका साकारली असून राजा दुष्यंतची व्यक्तिरेखा शकुंतलाला काही काळ विसरते.

मी आयुष्यात खूप काही शिकलो आहे - सामंथा
एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सामंथाला विचारण्यात आले की, तिच्या आयुष्यात असे काही आहे का जे तिला विसरायचे आहे. यावर तिने हा प्रश्न नात्याविषयी आहे का? असा प्रतिप्रश्न केला.
जेव्हा तिला हो असे सांगण्यात आले, तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देताना सामंथा म्हणाली, "मला काहीही विसरायचे नाही कारण प्रत्येक गोष्टीने मला आयुष्यात काहीतरी शिकवले आहे, त्यामुळे मला विसरायला आवडणार नाही. मला सगळं काही लक्षात ठेवायचे आहे कारण प्रत्येक गोष्टीने मला एक धडा दिला आहे."

सामंथा आणि नागा चैतन्य यांनी लग्नाच्या चार वर्षांनी एकमेकांना घटस्फोट दिला. त्यांच्या घटस्फोटाचे कारण कधीही समोर आले नाही. मात्र 'कॉफी विथ करण सीझन 7' मध्ये सामंथाने उघड केले होते, त्यांच्या नात्यात खूप अडचणी होत्या.

खरं तर सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य 2017 मध्ये लग्नगाठीत अडकले होते. आदर्श कपल म्हणून त्यांच्याकडे बघितले जात होते. मात्र लग्नाच्या चार वर्षांतच त्यांच्या घटस्फोटाची बातमी कळताच त्यांच्या चाहत्यांना जबरदस्त धक्का बसला होता. आता नागा चैतन्य प्रसिद्ध अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा होत आहेत.

कालिदास यांच्या 'अभिज्ञानमशाकुंतलम' या नाटकावर आधारित आहे हा चित्रपट
सध्या सामंथा तिच्या आगामी 'शकुंतलम' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. 'शकुंतलम' 14 एप्रिल रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. याआधी हा चित्रपट नोव्हेंबर 2022 मध्ये प्रदर्शित होणार होता, नंतर तो फेब्रुवारी 2023 पर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. सामंथा आणि देव यांच्याशिवाय या चित्रपटात सचिन खेडेकर, कबीर बेदी, आदिती बालन आणि जिशू सेनगुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा कालिदासांच्या 'अभिज्ञानमशाकुंतलम' या नाटकावर आधारित आहे.