आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटाचे दुःख:नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर समांथाने सोडले मौन, म्हणाली - 'माझे अफेअर चालू होते, मला मूल नको होते, माझा गर्भपात झाला आहे, अशा चर्चा माझ्याबद्दल सुरु आहे'

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काय म्हणाली समांथा..

नागा चैतन्यपासून घटस्फोटानंतर दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मौन सोडले आहे. तिने सोशल मीडियावर घटस्फोटावरुन तिला ट्रोल करणा-यांना खडेबोल सुनावले आहे.

यासह तिने तिला या कठीण काळात साथ देणा-या सगळ्यांचे आभारदेखील मानले आहेत. तिने लिहिले, 'माझ्या आयुष्यात आलेल्या वैयक्तिक संकटानंतर तुम्ही दिलेल्या भावनिक आधारामुळे मी फार भारावली आहे. माझ्याबद्दल इतकी दया दाखवल्याबद्दल आणि माझ्याबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवा आणि इतर विचित्र गोष्टींपासून माझे संरक्षण केल्याबद्दल धन्यवाद. काही जण माझ्याबद्दल फार अफवा पसरवत आहे. माझे अफेअर चालू होते. मला मूल नको होते. मी फार संधीसाधू आहे आणि माझा गर्भपात झाला आहे, यासारख्या गोष्टींची चर्चा माझ्याबद्दल सुरु आहे.'

समांथाने पुढे लिहिले, 'घटस्फोट ही स्वतःच एक वेदनादायक प्रक्रिया आहे. यावर मात करण्यासाठी मला एकटे सोडा. माझ्यावर केले जाणारे हे वैयक्तिक हल्ले अत्यंत वाईट आहेत. पण, तुम्ही तुम्हाला हवं ते बोला, पण या सर्व गोष्टी मला तोडू तोडू शकणार नाहीत.'

2 ऑक्टोबर रोजी सामंथा-नागाने केली घटस्फोटाची घोषणा

2 ऑक्टोबर रोजी समांथाने एक अधिकृत निवेदन जारी करत आम्हाला या कठीण काळात पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या, अशी विनंती चाहते आणि माध्यमांना केली होती. समांथाने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले होते, 'आमच्या सर्व हितचिंतकांनो, खूप विचारविनिमयानंतर, चाई (नागा चैतन्य) आणि मी पती-पत्नी म्हणून आपले मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आमची मैत्री दहा वर्षांपेक्षा जास्त आहे जी आमच्या नात्याचा आधार होती. जी आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष नाते ठेवेल.'

चाहते आणि माध्यमांना केली होती विनंती
समांथाने पुढे लिहिले होते, 'आम्ही आमच्या चाहत्यांना, माध्यमांना आणि हितचिंतकांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्या आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्या. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार.'

200 कोटींची पोटगी नाकारली
लग्नाच्या जवळपास चार वर्षांनंतर समांथा आणि नागा विभक्त झाले. दरम्यान, समांथाला नागाचैतन्य आणि त्याच्या कुटुंबियांकडून तब्बल 200 कोटी रुपयांची पोटगी ऑफर करण्यात आल्याचे वृत्त आले होते. पण समांथाने ती रक्कम घेण्यास नकार दिला. मी स्वतःच्या पायावर उभी आहे, त्यामुळे नागा चैतन्यच्या कुटुंबियांकडून एक रुपयादेखील नको असल्याचे तिने स्पष्ट केल्याचे म्हटले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...