आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 किलोची साडी, तीन कोटींचे दागिने:'शाकुंतलम'साठी सामंथाचे महागडे कपडे, कालिदासच्या नाटकावर आधारित आहे चित्रपट

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामंथा प्रभू लवकरच कालिदासाच्या 'शाकुंतलम' या नाटकावर आधारित 'शाकुंतलम' या चित्रपटात झळणाक आहे. या चित्रपटासाठी तिने 3 कोटींचे दागिने आणि सुमारे 30 किलो वजनाची साडी आठवडाभर परिधान केल्याचे वृत्त आहे. राजा दुष्यंत आणि शकुंतला यांची प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

सामंथा या चित्रपटात शकुंतलाची भूमिका साकारत आहे, तर अभिनेता देव मोहन राजा दुष्यंतच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 17 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाचे बजेट 60 ते 70 कोटी
महाकवी कालिदासाच्या 'शाकुंतलम' या जगप्रसिद्ध नाटकावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरस्कार विजेते दिग्दर्शक गुणशेखर यांनी केले आहे. हा चित्रपट थ्रीडीमध्ये प्रदर्शित होणार असून त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब झाला आहे.

हा चित्रपट आधी 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु 3D रूपांतरणास उशीर झाल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. चित्रपटाचे बजेट 60 ते 70 कोटींच्या आसपास आहे.

आजारपणातही सामंथाने चित्रपटात केले काम
5 जानेवारी रोजी सामंथाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती 'शाकुंतलम'साठी डबिंग करताना दिसली होती. सामंथाने फोटोसोबत कॅप्शनही लिहिले, 'जगात वेडेपणा, दुःख आणि तोट्याचा इलाज कला आहे.' सामंथाने 3 महिन्यांपूर्वी ती मायोसाइटिस नावाच्या आजाराने पीडित असल्याचा खुलासा केला होता.

सामंथाने स्वतः आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याचा खुलासा केला होता. आजारपणातही काम सुरू असून लवकरच या आजारातून बरी होईल, असे ती म्हणाली होती.

येत्या काही दिवसांत विजय देवराकोंडा आणि वरुण धवनसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार सामंथाचा अलीकडेच 'यशोदा' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. 'शाकुंतलम' व्यतिरिक्त सामंथा 'खुशी' या रोमँटिक ड्रामा चित्रपटात विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे. हा चित्रपट आधी डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता, पण एका मुलाखतीदरम्यान विजयने सांगितले की, हा चित्रपट फेब्रुवारी 2023 मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

सिटाडेल या अमेरिकन सिरीजच्या भारतीय रिमेकमध्येही सामंथा दिसणार आहे. यात तिच्यासोबत वरुण धवन झळकणार आहे. खरं तर आजारपणामुळे सामंथा या प्रोजेक्टमधून बाहेर पडल्याचे वृत्त होते. मात्र प्रोजेक्ट्समधून बॅकआउट होत असल्याचे वृत्त खोटे असल्याचे तिच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...