आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समीरा रेड्डीचे बॉलिवूडमधील वाईट अनुभव:8 वर्षांपासून सिनेसृष्टीपासून दूर असणारी समीरा म्हणाली - 'निर्माता आणि एका हीरोनेे सेक्सुअल फेव्हरची मागणी केली होती’

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 वर्षांपासून चित्रपट न करणाऱ्या समीराने नाव न घेता केले अनेक दावे केले आहेत.

मागील 8 वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर असलेल्या समीरा रेड्डीचा दावा आहे की, तिला कारकीर्दीच्या सुरुवातीला कास्टिंग काउच आणि नेपोटिझमचा अनुभव आला. समीराने एका मुलाखतीत या घटनांचा उल्लेख केला आहे. समीराच्या मते, तिच्याकडे दोन वेळा अप्रत्यक्षरित्या सेक्सुअल फेव्हरची मागणी झाली होती. एकदा एका निर्मात्याने, दुसऱ्यांदा एका हीरोने असे केले होते.

  • निर्मात्याने अचानक किसिंग सीन करण्यास सांगितले

एका मुलाखतीत समीरा म्हणते , "मी एक चित्रपट करत होते. अचानक मला सांगण्यात आले की यात एक किसिंग सीन असेल. तो पूर्वी नव्हता, त्यामुळे मी त्यास नकार दिला. मग निर्मात्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला की, यापूर्वीच्या चित्रपटात असा सीन केला होतास. मी उत्तरादाखल म्हणाले, याचा अर्थ असा नव्हे की असेच मी नेहमी करावे. त्यानंतर टोमणा मारत ते म्हणाले की, प्लीज हे चांगल्या पद्धतीने साकार.

  • हीरोने म्हटले, तू बोअरिंग आहेस

दुसऱ्या घटनेबाबत तिने सांगितले,"एका अभिनेत्याने माझ्याबाबत टिप्पणी केली होती की, तू खूपच अनअॅप्रोचेबल आहेस. त्याने मला बोअरिंग संबोधले आणि म्हणाला की, तुझ्यासोबत मजा येत नाही. तो म्हणाला की तुझ्यासोबत पुन्हा काम करण्याची इच्छा नाही आणि त्या चित्रपटानंतर मी पण त्याच्यासोबत कधीच काम केले नाही.’

  • स्टार-किडसाठी माझी गच्छंती

समीराने सांगितले, "मला तीन चित्रपटांतून काढून टाकण्यात आले होते. खरे कारणही सांगण्यात आले नाही. एकदा स्टार-किडसाठी बदलण्यात आले आणि दुसऱ्या वेळी हीरो अन्य दुसरीबरोबर फ्रेंडली होता म्हणून काढून टाकण्यात आले होते.

  • बॉलिवूडमध्ये शेवटची 'तेज'मध्ये दिसली होती समीरा

- समीराने 2002 मध्ये "मैंने दिल तुझको दिया' या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू केला होता. तिने 'मुसाफिर' (2004), 'अशोक' (2006), 'रेस' (2008) आणि 'दे दना दन' (2009) या चित्रपटांमध्ये काम केले. लीड अॅक्ट्रेस म्हणून तिचा शेवटचा चित्रपट 'तेज' (2012) होता. त्यानंतर 'चक्रव्यूह' (2012) या चित्रपटातील एका गाण्यात तिने स्पेशल अपिअरन्स दिला होता.