आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Samrat Prithviraj Box Office Estimate Day 4, Akshay Kumar's Fails To Pass The Monday Test; Drops By More Than 50% To Collect Approx Rs. 5 Crores

बॉक्स ऑफिस:फर्स्ट मंडे टेस्टमध्ये नापास ठरला अक्षयचा 'सम्राट पृथ्वीराज', व्यवसायात 50% पेक्षा जास्त घसरण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चित्रपटाने चौथ्या दिवशी केवळ 6 कोटींची कमाई केली

अभिनेता अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर स्टारर 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरची कमाई आता मंदावली आहे. यासोबतच पहिल्या सोमवारच्या चाचणीतही हा चित्रपट नापास झाला आहे. चौथ्या दिवशी हा चित्रपट भारतात केवळ 5 कोटींचा गल्ला जमवू शकला आहे. इतकेच नाही तर या चित्रपटाने 4 दिवसांत जवळजवळ 45 कोटींचा व्यवसाय केला आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 50% पेक्षा जास्त घट झाली आहे. हा चित्रपट लाइफटाइम 100 कोटींची कमाई करू शकणार नाही, असा अंदाज व्यापार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

चित्रपटाने चौथ्या दिवशी केवळ 6 कोटींची कमाई केली
वृत्तानुसार, 300 कोटींच्या मेगा बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चौथ्या दिवशी (सोमवार) जवळपास 5 कोटींचा व्यवसाय केला आहे. याआधी या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी (रविवार) 16.10 कोटी, दुसऱ्या दिवशी (शनिवार) 12.60 कोटी आणि पहिल्या दिवशी (शुक्रवारी) 10.70 कोटींची कमाई केली होती.

कमाई मंदावल्याने चित्रपटाचे अनेक शो रद्द करण्यात आले.
3,750 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसांत भारतातून फक्त 44.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर वर्ल्ड वाइड हा आकडा 68 कोटींहून अधिकचा आहे. चित्रपटाची कमाई मंदावल्याने आता जगभरात चित्रपटाचे अनेक शो रद्द करण्यात आल्याचे वृत्त आहे.

कार्तिकच्या 'भूल भुलैया 2'ने 18 दिवसांत केली 157 कोटींची कमाई
'सम्राट पृथ्वीराज'च्या रिलीजचा कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' च्या कलेक्शनवर फारसा फरक पडलेला नाही. या चित्रपटाने 18 दिवसांत 157 कोटी आणि जगभरात 210 कोटींचा गल्ला जमवला आहे. 18व्या दिवशी (रविवार) चित्रपटाने भारतात 2.25 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित झाला होता.

एवढेच नाही तर फर्स्ट वीकेंडच्या बाबतीतही अक्षय कुमार कार्तिक आर्यनच्या मागे पडला आहे. कारण, कार्तिकच्या 'भूल भुलैया 2' ने पहिल्या वीकेंडमध्ये म्हणजेच अवघ्या तीन दिवसांत 55.96 कोटींचा व्यवसाय केला होता. तरण आदर्श यांच्या मते 24 जूनपर्यंत चित्रपट 175 कोटींचा टप्पा ओलांडेल.

चित्रपटासोबत आहे 'विक्रम' आणि 'मेजर'ची स्पर्धा
दुसरीकडे, 'सम्राट पृथ्वीराज' सोबत 3 जून रोजी प्रदर्शित झालेल्या साऊथचे सुपरस्टार कमल हसन यांच्या 'विक्रम'ने पहिल्या वीकेंडमध्ये म्हणजेच 4 दिवसांत भारतातून 121.17 कोटींहून अधिक कमाई केली आणि आदिवी शेषच्या 'मेजर'ने 30 कोटींहून अधिक कमाई केली. तर वर्ल्डवाइड 'विक्रम'ने 192.67 कोटी आणि 'मेजर'ने 41.2 कोटी रुपये कमावले आहेत. या दोन्ही चित्रपटांमुळे 'सम्राट पृथ्वीराज'ला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे.

2022 मध्ये पहिल्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा 6वा चित्रपट ठरला
यासह 'सम्राट पृथ्वीराज' 2022 मधील पहिल्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा 6 वा चित्रपट ठरला आहे. या यादीत KGF-2 पहिल्या वीकेंडमध्ये 193.99 कोटी रुपयांच्या कमाईसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, डॉक्टर स्ट्रेंज (79.5 कोटी) दुसऱ्या, आरआरआर (75.57 कोटी) तिसऱ्या, भूल भुलैया-2 (55.96 कोटी) चौथ्या, गंगूबाई काठियावाडी (39.12 कोटी) पाचव्या आणि बच्चन पांडे (36.17 कोटी) सातव्या क्रमांकावर आहेत.

अक्षय 'सम्राट पृथ्वीराज'च्या भूमिकेत झळकला
'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटात भारताचे शूर योद्धा सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनाची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अक्षय पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत झळकला आहे. तर माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने चित्रपटात सम्राट पृथ्वीराज यांची पत्नी संयोगिताची भूमिका वठवली आहे.

'पृथ्वीराज'चे लेखन आणि दिग्दर्शन डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय-मानुषीशिवाय संजय दत्त, सोनू सूद, साक्षी तन्वर, आशुतोष राणा, ललित तिवारी आणि मानव विज हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...