आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्षय कुमार स्टारर 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट 3 जून रोजी प्रदर्शित झाला आहे. 300 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची कमाई अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे, या चित्रपटाने 9 दिवसांत केवळ 71 कोटींची कमाई केली आहे. माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने अक्षय कुमारसोबत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित या चित्रपटाची कमाई निराशाजनक आहे. कारण अनेक ए-लिस्टर्सच्या याआधीच्या ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. तर काही चित्रपट त्यांचा निर्मिती खर्चही वसूल करु शकले नाहीत.
मुघल-ए-आझम हा बॉलिवूडचा सर्वात यशस्वी ऐतिहासिक चित्रपट असल्याचे म्हटले जाते. या धाटणीचे चित्रपट 1913 पासून बनवले जात आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला चित्रपट, 'राजा हरिश्चंद्र' हा ऐतिहासिक चित्रपट होता, त्यानंतर भारतात ऐतिहासिक चित्रपट बनण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून या धाटणीचे अनेक चित्रपट बनले आहेत. चला जाणून घेऊया ऐतिहासिक चित्रपट आणि त्यांच्या कलेक्शनविषयी -
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.