आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर स्टारर 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ठिकठाक कामिगिरी केली आहे. या चित्रपटाने 3 दिवसांत भारतातून 40 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या तुलनेत तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 50% आणि 20% वाढ झाली आहे.
या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी केली 16.10 कोटींची कमाई
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सांगितले की, 300 कोटींच्या मेगा बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी (रविवार) 16.10 कोटींचा गल्ला जमवला आहे. याआधी या चित्रपटाने पहिल्या दिवशी (शुक्रवारी) 10.70 कोटी रुपये आणि दुसऱ्या दिवशी (शनिवारी) 12.60 कोटी रुपयांची कमाई केली होती.
त्यानुसार, 3,750 हून अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्ये म्हणजेच 3 दिवसांत भारतातून 39.40 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तर वर्ल्ड वाइड चित्रपटाने 60 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.
2022 मध्ये पहिल्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा 6वा चित्रपट ठरला
यासह 'सम्राट पृथ्वीराज' 2022 मधील पहिल्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा 6 वा चित्रपट ठरला आहे. या यादीत KGF-2 पहिल्या वीकेंडमध्ये 193.99 कोटी रुपयांच्या कमाईसह पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, डॉक्टर स्ट्रेंज (79.5 कोटी) दुसऱ्या, आरआरआर (75.57 कोटी) तिसऱ्या, भूल भुलैया-2 (55.96 कोटी) चौथ्या, गंगूबाई काठियावाडी (39.12 कोटी) पाचव्या आणि बच्चन पांडे (36.17 कोटी) सातव्या क्रमांकावर आहेत.
पहिल्या वीकेंडला कार्तिकपेक्षा पिछाडीवर राहिला खिलाडी कुमार
'सम्राट पृथ्वीराज'च्या रिलीजमुळे कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' च्या कलेक्शनमध्ये फारसा फरक पडला नाही. कार्तिकच्या चित्रपटाने 17 दिवसांत भारतात सुमारे 150 कोटी आणि वर्ल्डवाइड 200 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. 17व्या दिवशी (रविवार) चित्रपटाने भारतातून 5.71 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 20 मे रोजी प्रदर्शित झाला होता. एवढेच नाही तर फर्स्ट वीकेंडच्या बाबतीतही अक्षय कुमार कार्तिक आर्यनच्या मागे पडला आहे. कारण, कार्तिकच्या 'भूल भुलैया 2' ने पहिल्या वीकेंडमध्ये म्हणजेच तीन दिवसांत 55.96 कोटींचा व्यवसाय केला होता.
चित्रपटासोबत आहे 'विक्रम' आणि 'मेजर'ची स्पर्धा
दुसरीकडे, 'सम्राट पृथ्वीराज' सोबत 3 जून रोजी प्रदर्शित झालेल्या साऊथचे सुपरस्टार कमल हसन यांच्या 'विक्रम'ने पहिल्या वीकेंडमध्ये म्हणजेच 3 दिवसांत भारतातून 100 कोटींहून अधिक कमाई केली आणि आदिवी शेषच्या 'मेजर'ने 25 कोटींहून अधिक कमाई केली. तर वर्ल्डवाइड 'विक्रम'ने 150.43 कोटी आणि 'मेजर'ने 38.4 कोटी रुपये कमावले आहेत. या दोन्ही चित्रपटांमुळे 'सम्राट पृथ्वीराज'ला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त स्पर्धा पाहायला मिळत आहे.
अक्षय 'सम्राट पृथ्वीराज'च्या भूमिकेत झळकला
'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटाचे भारताचे शूर योद्धा सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनाची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अक्षय पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत झळकला आहे. तर माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने चित्रपटात सम्राट पृथ्वीराज यांची पत्नी संयोगिताची भूमिका वठवली आहे.
'पृथ्वीराज'चे लेखन आणि दिग्दर्शन डॉ.चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षय-मानुषीशिवाय संजय दत्त, सोनू सूद, साक्षी तन्वर, आशुतोष राणा, ललित तिवारी आणि मानव विज हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषांमध्ये सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.