आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणात सॅम्युअल मिरांडाचा खुलासा:सुशांत खोली बंद करुन रडत असायचा, रात्री उठून हनुमानच्या फोटोला मिठी मारायचा, पैशांमुळे चिंतीत राहायचा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सॅम्युअल मिरांडाने सीबीआयला सांगितल्यानुसार, सुशांतची बहीण प्रियंका सिंहने कामावर त्याला नियुक्त केले होते.
  • होम मॅनेजर म्हणून सॅम्युअलचे काम सुशांतचा कर्मचारीवर्ग सांभाळणे आणि त्यांना पगार देणे हे होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूू प्रकरणात दररोज नवे खुलासे होत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान त्याचा होम मॅनेजर सॅम्युअल मिरांडाने सीबीआयला सांगितल्यानुसार, सुशांत अनेकदा आपली खोली बंद करुन रडत असायचा. मध्यरात्री उठून हनुमानाचा फोटो जवळ घ्यायचा.

मिरांडाला सुशांतची बहीण प्रियंकाआणि तिचा नवरा सिद्धार्थ यांनी नोकरीवर नियुक्त केले होते. त्याचे काम सुशांतचा कर्मचारी वर्ग सांभाळणे आणि त्यांना पगार देणे हे होते. मिरांडाने सीबीआयला सांगितले की, एक दिवस प्रियंकाचे सुशांतच्या घरी काम करणा-या अब्बाससोबत भांडण झाले होते. त्यानंतर अब्बासने नोकरी सोडली. त्याचकाळात दीपेशनेही नोकरी सोडली होती. सुशांतचे प्रियंकासोबत भांडण झाले होते, त्यानंतर ती आपल्या नव-यासोबत दिल्लीला निघून गेली होती, असा खुलासाही मिरांडाने चौकशीदरम्यान केला आहे.

  • सुशांतला बिझी ठेवण्यासाठी रिया घरी पार्टी आयोजित करायची

सॅम्युअल मिरांडाच्या म्हणण्यानुसार, रिया चक्रवर्तीचे मे 2019 पासून सुशांतच्या घरी बरेच येणे-जाणे सुरु झाले होते. रियाचा भाऊ शोविक आणि वडीलही सुशांतच्या घरी अनेकदा येत असत. रिया सुशांतबरोबर राहू लागली होती. याकाळात सुशांतला बिझी ठेवण्यासाठी रिया आठवड्यातून एकदा किंवा दोनदा घरी पार्टीचे आयोजन करायची. पण अनेकदा तो या पार्ट्यांमध्ये हजर नसायचा. तो स्वतःला आपल्या खोलीत बंदिस्त करुन घ्यायचा. याकाळात अनेकदा त्याच्या खोलीतून त्याचा रडण्याचा आवाज येत असे, असेही मिरांडाने सांगितले.

  • रात्री खोलीतून बाहेर येेऊन हनुमानाच्या फोटोला मिठी मारत असे

मिरांडाने पुढे सांगितल्यानुसार, रिया आणि अनेक कर्मचा-यांनी सुशांतचे जुने घर म्हणजेच कॅपरी हाइट्स येथे भूतबाधा असल्याचे म्हटले होते. त्यानंतर सुशांतने ते घर सोडून वांद्रेला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता. वांद्रे येथे आल्यानंतर बर्‍याच वेळा सुशांत रात्रीच्या वेळी आपल्या खोलीतून बाहेर येत असे आणि हनुमानाच्या फोटोला मिठी मारून परत आपल्या खोलीत जात असे. युरोपमधून परत आल्यानंतर हे सर्व घडले होते, असाही खुलासा त्याने केला. सुशांत रिया आणि शोविक यांच्यासोबत युरोप टूर गेला होता.

  • सुशांतला फायनान्सची चिंता वाटत असे

सुशांतला त्याच्या आर्थिक बाबींबद्दल काळजी वाटत असे. खूप फालतू खर्च होत असल्याचे त्याला वाटत होते. त्यानंतर तो अनेकदा मिटिंग बोलावून अकाऊंट्सचे डिटेल घेत असायचा. सुशांत आधी स्वतःच्या पैशांविषयी फारशी काळजी नसायची, असेही मिरांडाने सांगितले.

  • श्रुती मोदीच्या सांगण्यावरून सुशांत वॉटर स्टोन रिसॉर्टवर गेला होता

सॅम्युअल मिरांडाने सांगितल्यानुसार, सुशांतचे माजी मॅनेजर श्रुती मोदीने रिया आणि सुशांत यांना वॉटरस्टोन क्लबमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. पण सुशांतच्या तब्येतीत काही विशेष सुधारणा झाली नव्हती आणि तो खूप रडायचा. या क्लबमध्ये सुशांतच्या बहिणीही त्याला भेटायला आल्या असल्याचा दावा त्याने केला आहे.

  • काही दिवसांपूर्वी मिरांडाच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती

काही दिवसांपूर्वीच सॅम्युअल मिरांडाच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, त्यानंतर सॅम्युअलने स्वत: तो बरे असल्याची माहिती दिली होती. याबद्दल त्याने आपल्या इंस्टाग्रामवर लिहिले होते, 'हॅलो मित्रांनो, सहकार्याबद्दल धन्यवाद, मी ठीक आहे आणि जिवंत आहे. माझे अकाउंट इतर कुणीही वापरत नाहीये.'

मृत्यूची बातमी व्हायरल झाल्यानंतर सॅम्युअल मिरांडाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून तो बरा असल्याचे सांगितले होते.
मृत्यूची बातमी व्हायरल झाल्यानंतर सॅम्युअल मिरांडाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून तो बरा असल्याचे सांगितले होते.