आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री सना खान लवकरच आई होणार आहे. सना आणि तिचे पती मुफ्ती अनस सईद यांनी अलीकडेच एखा मुलाखतीत ही गोड बातमी शेअर केली आहे. सना खानने 'जय हो', 'वजह तुम हो', 'टॉयलेट: एक प्रेम कथा', 'सिलमबट्टम' आणि 'मिस्टर नुक्या' यांसारख्या हिंदी, तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2021 मध्ये सना खानने फिल्म इंडस्ट्रीला रामराम ठोकला होता.
सना खानला उमराह करायचा आहे
गेल्या महिन्यात सनाने सोशल मीडियावर लिहिले होते की, ती लवकरच एक खास बातमी शेअर करणार आहे. तिने यावेळी उमराह करण्याची इच्छाही व्यक्त केली होती.
आई होण्याची आतुरतेने वाट पाहत आहे- सना
सना खान आणि अनस सईद यांनी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, येत्या जून महिन्यात त्यांच्या बाळाचा जन्म होणार आहे. मुलाखतीदरम्यान आई होण्याची भावना कशी आहे, असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ती म्हणाली की, मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे.
सना म्हणाली- मी माझ्या आयुष्यातील या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे. मी खूप भावनिक आहे आणि माझ्या चिमुकल्या बाळाला माझ्या मिठीत घेण्याची वाट पाहत आहे. यावेळी सनाने जुळी बाळं येणार नसल्याचे स्पष्ट केले. पण भविष्यात दुसऱ्या बाळाचा विचार नक्की करणार असल्याचे ती म्हणाली. मुलाखतीच्या क्लिपवर चाहत्यांनी या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.
दोन वर्षांपूर्वी एक पोस्ट शेअर करत दिली होती सिनेसृष्टीला अलविदा करत असल्याची माहिती
दोन वर्षांपूर्वी सनाने एक पोस्ट शेअर करत सिनेसृष्टीला अलविदा करत असल्याचे सांगितले होते. ती म्हणाली होती, ‘आज मी माझ्या आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आली आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि त्या काळात मला प्रसिद्धी, पैसा, सन्मान या सर्व गोष्टी मिळाल्या. पण पैसा आणि प्रसिद्धीच्याच मागे धावणं हा एकमेव जगण्याचा उद्देश आहे का, असा प्रश्न मला सतावू लागला. गरजू व्यक्तींना मदत करण्याचं कर्तव्य प्रत्येकाचं नाही का? या प्रश्नांची उत्तर मी बऱ्याच काळापासून शोधत होते. जेव्हा मी माझ्या धार्मिक शिकवणीत या प्रश्नांची उत्तर शोधली, तेव्हा मला समजलं की फक्त पैसा आणि प्रसिद्धी कमावणं हाच आयुष्याचा एकमेव उद्देश नाही. त्यामुळे मी आजपासून फिल्म इंडस्ट्रीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय घेते आणि यापुढे मी लोकांची, गरजूंची सेवा करेन.’
बिग बॉस फेम एजाज खानने करुन दिली होती सना आणि अनस यांची भेट
सनाने मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी निकाह केला आहे. विशेष म्हणजे निकाह केल्यानंतर सनाने तिचे सोशल मीडियावर नावदेखील बदलले आहे. सनाने निकाह झाल्यानंतर तिच्या नवऱ्यासोबत एक फोटो शेअर केला होता. सोशल मीडियावर आपले नाव बदलून आता सय्यद सना खान असे केले आहे. सना खान आणि तिच्या पतीची ओळख बिग बॉस फेम एजाज खानमुळे झाल्याचे सांगण्यात येते. सना यापूर्वी बिग बॉस 6 आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईसमुळे चर्चेत होती. सना आणि मेल्विन एकमेकांना डेट करत होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.