आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्म इंडस्ट्री सोडून हिजाबबद्दल व्यक्त झाली सना खान:म्हणाली- रोज रात्री स्वप्नात मला माझी जळणारी कबर दिसायची

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सनाला स्वप्नात जळणारी कबर दिसायची

सना खानने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून एक खुलासा केला आहे. फिल्म इंडस्ट्री सोडून आपली जीवनशैली बदलण्याचा का निर्णय घेतला, याबाबत सनाने सांगितले आहे. रमजानमध्ये मला स्वप्नात माझी कबर दिसायची. त्यामुळे तो अल्लाहचा इशारा समजून मी माझ्या जीवनशैलीत बदल केले, असा खुलासा सनाने केला.

सर्व काही असूनही मी आनंदी नव्हते - सना
व्हिडिओमध्ये सना काळा बुरखा घातलेली दिसत आहे. ती म्हणाली, "माझ्या भूतकाळात माझ्याकडे नाव, प्रसिद्धी, पैसा सर्वकाही होते. मी हवे ते करू शकले असते, पण एक गोष्ट हरवत होती आणि ती म्हणजे माझ्या मनातील शांती. मला वाटायचे की माझ्याकडे सर्व काही आहे, मग मी आनंदी का नाही? हे खूप कठीण होते आणि मी ब-याच काळापासून डिप्रेशनमध्ये होतो. असे दिवस होते जेव्हा अल्लाह मला चिन्हांद्वारे इशारा देण्याचा प्रयत्न करायचा," असे सनाने सांगितले.

सनाला स्वप्नात जळणारी कबर दिसायची
सना त्या वर्षाबद्दल सांगते ज्याने तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. ती म्हणाली, "मला 2019 मध्ये रमजानमध्ये माझ्या स्वप्नात माझी कबर दिसली होती. मला एक जळणारी, धगधगणारी कबर दिसली होती. त्यात मी स्वतःला पाहिले होते. देवाने मला इशारा दिला होता की, जर मी स्वत:ला बदलले नाही तर एकेदिवशी माझा शेवट असाच होईल. त्यामुळे माझी एंझायटी वाढू लागली होती," असे सनाने सांगितले.

या कारणामुळे सना खानने हिजाब परिधान केला होता
हिजाबबद्दल पुढे बोलताना सना म्हणाली, "बदल होत होते. मी प्रेरणादायी इस्लामिक भाषणे ऐकायचे. एका रात्री मी एक अतिशय सुंदर गोष्ट वाचली, ज्यामध्ये एक संदेश लिहिला होता. हिजाब परिधान करण्याचा पहिला दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस असेल, असा विचार तुम्ही करणार का? ती गोष्ट माझ्या मनात बसली. मी दुसऱ्या दिवशी उठले, तो माझा वाढदिवस होता. मी माझा स्कार्फ काढला आणि तो घातला आणि तो कधीही काढणार नाही असे मनाशी पक्के ठरवले."

2020 मध्ये इस्लामिक स्कॉलरशी केला निकाह
सनाने ऑक्टोबर 2020 मध्ये चित्रपटसृष्टी सोडण्याची घोषणा केली होती. यानंतर तिने 21 नोव्हेंबर 2020 रोजी सुरत येथे इस्लामिक विद्वान मुफ्ती अनस सय्यद यांच्याशी विवाह केला. सना नुकतीच पतीसोबत हजला गेली होती. धार्मिक सहलीबद्दल आनंद व्यक्त करताना ती म्हणाली, "मी आता खूप आनंदी आहे कारण मी स्वतःमध्ये बदल केला आहे. आता मी कधीही माझा हिजाब काढणार नाही."

सनाने अनेक चित्रपटांमध्ये केलंय काम
सनाला 'बिल्लो रानी' या डान्स नंबरमुळे ओळख मिळाली. ती सलमान खानसोबत 'जय हो' चित्रपटातही दिसली होती. याशिवाय ती 'वजाह तुम हो' आणि 'टॉयलेट: एक प्रेमकथा' मध्येही झळकली आहे. 'बिग बॉस 6' ची सना फायनलिस्ट देखील राहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...