आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वेडिंग डायरी:सना खानने लग्नात परिधान केलेल्या लहेंग्याची एवढी आहे किंमत, पती अनसने हटके अंदाजात केले कौतुक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एजाजने करुन दिली दोघांची भेट

नववधू सना खान विवाहित जीवनाचा आनंद लुटत आहे. दरम्यान, ती तिच्या चाहत्यांसाठीसुद्धा तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत आहे. बुधवारी तिने आपल्या मेहंदीचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. लग्नात सनाने परिधान केलेल्या लहेंग्याची किंमत जवळजवळ एक लाख रुपये आहे. डिझायनर पूनम्स कॉर्चर ब्रॅण्डचा लहेंगा तिने निवडला होता. याची किंमत 1350 डॉलर म्हणजेच 99 हजार 879 रुपये इतकी आहे. या लहेंग्यावर हेवी गोल्डन एम्ब्रॉयडरी आहे.

चाहते आश्चर्यचकित झाले
लाल रंगाच्या लहेंग्यात सना अतिशय सुंदर दिसत होती. मात्र, या लग्नामुळे तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत, कारण लग्नापूर्वी सनाने सोशल मीडियावर याबद्दल कोणतीही माहिती शेअर केली नव्हती. लग्नानंतर तिने आपली छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली. यात तिने लिहिले- वलीमा लूक. रविवारी सनाने तिचे पती मुफ्ती अनस यांच्यासोबतची काही छायाचित्रे इंस्टाग्रामवरही शेअर केली.

एजाजने करुन दिली दोघांची भेट
सनाने मौलाना मुफ्ती अनस यांच्याशी निकाह केला आहे. विशेष म्हणजे निकाह केल्यानंतर सनाने तिचे सोशल मीडियावर नावदेखील बदलले आहे. सनाने निकाह झाल्यानंतर तिच्या नवऱ्यासोबत एक फोटो शेअर केला होता. सोशल मीडियावर आपले नाव बदलून आता सय्यद सना खान असे केले आहे. सना खान आणि तिच्या पतीची ओळख बिग बॉस फेम एजाज खानमुळे झाल्याचे सांगण्यात येते. सना यापूर्वी बिग बॉस 6 आणि प्रसिद्ध कोरिओग्राफर मेल्विन लुईसमुळे चर्चेत होती. सना आणि मेल्विन एकमेकांना डेट करत होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचा ब्रेकअप झाला.

पती अनस यांनीही केले कौतुक
दरम्यान, सनाचे पती अनस यांनीही आपले इंस्टाग्राम अकाउंट खुले केले आहे. ज्यामध्ये त्यांनी सनाबरोबरचा आपला लग्नाचा फोटो शेअर केला आणि लिहिले की, ''माझ्या आयुष्यात आल्याबद्दल आणि एक सुंदर प्रवासाला सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद. तुझ्याबरोबर आनंदी आयुष्याची आशा आहे. सदैव तुझाच.''

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser