आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'कुछ कुछ होता है' या चित्रपटात शाहरुख खानची ऑनस्क्रीन मुलगी अंजलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सना सईद हिचा नुकताच साखरपुडा झाला आहे. सनाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून तिच्या एंगेजमेंटची घोषणा केली आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सना तिच्या बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहे. सनाचा बॉयफ्रेंड परदेशी आहे आणि त्याचे नाव साबा वोनर आहे. साबा हा हॉलिवूडची आघाडीचा साउंड इंजिनियर आहे.
सना सईद आणि साबाने शेअर केला व्हिडिओ
सना आणि साबाने सोशल मीडियावर त्यांचा एंगेजमेंट व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये साबा वोनरने गुडघ्यावर बसून सनाला प्रपोज केले आहे. साबाचे प्रपोजल पाहून सना खूप आनंदी होते आणि त्याला हो म्हणते. यानंतर दोघेही एकमेकांना मिठी मारतात. व्हिडिओसोबतच सनाने रोमँटिक फोटोही शेअर केले आहेत. यावेळी सना ब्लॅक गाऊनमध्ये सुंदर दिसली.
चाहत्यांनी केला सनावर शुभेच्छांचा वर्षाव
ही पोस्ट सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी सना आणि तिचा भावी पती साबा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एका यूजरने कमेंटमध्ये लिहिले - 'अंजलीला अखेर तिचा राहुल मिळाला.' तसेच अनेक सेलिब्रिटींनी सनाला तिच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. साबा वोनर ही हॉलिवूड साउंड डिझायनर असून लॉस एंजिलिसमध्ये वास्तव्याला आहे. दोघेही ब-याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये झळकली सना
सना 'कुछ कुछ होता है', 'बादल', 'हर दिल जो प्यार करेगा' यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली आहे. याशिवाय तिने 'लो हो गई पूजा इस घर की' आणि 'बाबुल का आंगन छुटे ना' यांसारख्या टीव्ही शोमध्येही काम केले आहे. 'झलक दिखला जा', 'नच बलिए 7' आणि 'खतरों के खिलाडी 7' सारख्या रिअॅलिटी शोचाही ती भाग ठरली. 'स्टुडंट ऑफ द इयर' या चित्रपटात ती शेवटची दिसली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.