आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमली पदार्थांच्या पॅडलिंगच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या कन्नड अभिनेत्री रागिनी द्विवेदीने तिच्या लघवीमध्ये पाणी घालून ड्रग्ज टेस्टमध्ये फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, डॉक्टरांनी सॅम्पलमधील पाणी ओळखले. त्यानंतर, रागिनीला पुन्हा पाणी प्यायला लावण्यात आले आणि आणि पुन्हा तिच्या यूरिनचा नमुना घेतला गेला. बंगळुरूच्या केसी जनरल हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रागिनीची ड्रग्ज टेस्ट झाली.
सेंट्रल क्राइम ब्रांच (CCB) च्या अधिका्यांनी रागिनीचे वागणे लज्जास्पद आणि दुर्दैवी म्हटले. शुक्रवारी त्याने दंडाधिका-यांसमोर घटनेचा उल्लेख केला आणि अभिनेत्रीची पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी केली. अभिनेत्रीची चौकशी करण्यासाठी न्यायाधीशांनी त्यांना आणखी तीन दिवसांचा कालावधी वाढवून दिला आहे.
लघवीच्या चाचणीद्वारे संबंधित व्यक्तीने गेल्या काही दिवसांत ड्रग्जचे सेवन केले की नाही, हे तपासले जाते. पाण्याचे प्रमाण यूरीनचे तापमान कमी करते, जे शरीराच्या तपमानाच्या जवळपास असते.
सीसीबीच्या माहितीनुसार, रागिनीने तिचा जवळचा मित्र रविशंकरसह सायमन नावाच्या एका अमेरिकन व्यक्तीकडूनही ड्रग्ज घेतले होते. सायमनने तिच्या घरी एमडीएमएच्या गोळ्या पोहोचवल्या होत्या.
या प्रकरणात अटक झालेल्या कन्नड अभिनेत्री संजना गलरानीने बंगळुरू पोलिसांसोबत वाद केल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. तर सीसीबीच्या म्हणण्यानुसार, रागिनीनेही पोलिसांसमोर नखरे दाखवले होते. तिने अधिका-यांशी वाद घातला आणि आपल्या वकिलाला विचारल्याशिवाय यूरिन टेस्ट देणार नसल्याचे म्हटले होते.
4 सप्टेंबर रोजी सकाळी सीसीबीच्या पथकाने रागिनीच्या घरावर छापा टाकला आणि तिला ताब्यात घेतले. त्याच संध्याकाळी चौकशी करून तिला अटक करण्यात आली. तेव्हापासून ती पोलिस कोठडीत आहे.
21 ऑगस्ट रोजी एनसीबीने मोठी कारवाई करत कर्नाटकमधील ड्रग्ज रॅकेटचा भंडाफोड केला आणि अनेक ड्रग पॅडलरला अटक केली. यानंतर, सँडलवूडचा याच्याशी संबंध असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात रागिनीशिवाय संजना गलरानी, नियाज, रविशंकर, राहुल, वीरेन खन्ना, एक आफ्रिकन पॅडलर, प्रशांत रंकासह अनेकांना अटक करण्यात आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.