आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संदीप नहार आत्महत्या प्रकरण:सोशल मीडियावरून गायब झाली सुसाइड नोट आणि शेवटचा व्हिडिओ; पोलिसांनी सांगितले- आम्ही कंटेंट डिलीट केलेला नाही

ज्योती शर्मा18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संदीप नाहारने सोमवारी आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने सोशल मीडियावर सुसाइड नोट आणि व्हिडिओ मेसेज पोस्ट केला होता. या दोन्ही गोष्टी आता सोशल मीडियावर नाहीत.

'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' आणि 'केसरी' यासारख्या मोठ्या चित्रपटात काम करणारा अभिनेता संदीप नाहरची सुसाइड नोट आणि व्हिडिओ सोशल मीडियावरुन गायब झाले आहेत. पोलिसांनी हा कंटेंट डिलीट केले नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता संदीपची सुसाइड नोट आणि व्हिडिओ सोशल मीडियावरुन कुणी डिलीट केले, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

संदीपने सोमवारी आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने सोशल मीडियावर सुसाइड नोट आणि जवळजवळ 9 मिनिटांचा व्हिडिओ शेअर करत आत्महत्येमागचे कारण सांगितले होते. दैनिक भास्करसोबत बोलताना मुंबई पोलिसांचे डीसीपी विशाल ठाकूर (झोन 11) म्हणाले- पोलिसांकडून व्हिडिओ डिलीट करण्यासाठी रिक्वेस्ट पाठवण्यात आली नाही. तसेच आमच्याकडूनही कोणतीही पोस्ट हटविली गेली नाही. कदाचित पॉलिसीचा भाग म्हणून फेसबुकने तो कंटेंट डिलीट केला असावा. कोणत्याही आक्षेपार्ह कंटेंटबद्दल फेसबुकला रिपोर्ट केल्यास ते हटवले जाते. त्याचा तपास सुरू आहे. फेसबुकवरून ती पोस्ट कोणी डिलीट केली? ते कधी आणि केव्हा डिलीट केले गेले? हा चौकशीचा विषय आहे.

असे म्हटले जात आहे की, ही पोस्ट संदीपची पत्नी कांचन शर्माने डिलीट केली असावी किंवा एखाद्या यूजरद्वारे रिपोर्ट केल्यानंतर सोशल मीडिया कंपनीनेच ती डिलीट केले असावे. मात्र याक्षणी केवळ या शक्यता आहेत.

14 महिन्यांचा डेटा गायब

संदीपचे सोशल मीडिया अकाउंट पाहता, केवळ त्याची सुसाईड नोट किंवा व्हिडिओच नव्हे तर मागील 14 महिन्यांचा डेटाही अकाउटंवरुन गायब आहे. त्यापैकी एक पोस्ट त्याने पत्नीला करवा चौथचा शुभेच्छा देताना लिहिली होती. तर दुसरी पोस्ट संदीपने गेल्यावर्षी सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या दिवशी (14 जून) लिहिली होती. आता त्याच्या पेजवर शेवटची पोस्ट 17 डिसेंबर 2019 ची दिसतेय.

सुसाईड नोटमध्ये पत्नी त्रास देत असल्याचा केला उल्लेख

संदीपने आपल्या सुसाइड नोटमध्ये पत्नी कांचन शर्मा आणि सासू वुनु शर्मा यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. संदीपने लिहिले, “आता जगण्याची इच्छा होत नाहीये. जीवनात अनेक सुख दु:ख बघितले, पण सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणे भीत्रेपणाचे लक्षण आहे हे मला माहितीये, मलाही जगायचे होते. पण जिथे आत्मसन्मान आणि समाधान नसेल तिथे जगून तरी काय फायदा…माझी पत्नी कांचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला कधी समजून घेतले नाही किंवा कधी साधा तसा प्रयत्नही केला नाही. माझी बायको शिघ्रकोपी आहे. आमच्या दोघांच्याही व्यक्तीमत्वात खूप फरक आहे…रोज सकाळ-संध्याकाळ होणारी भांडणं सहन करण्याची ताकद आता माझ्यात नाही… यात माझ्या बायकोची चूक नाही…कारण तिला सगळं नॉर्मल वाटते… पण माझ्यासाठी हे सामान्य नाही… मुंबईत अनेक वर्षांपासून आहे… खूप वाईट वेळही बघितली पण कधी ढासळलो नव्हतो... डबिंग केले. जिम ट्रेनर झालो. वन रुम किचनमध्ये आम्ही 6 जण राहत होतो... स्ट्रगल होते पण समाधान होते. आज मी खूप काही मिळवले आहे. पण लग्नानंतर समाधान नाही. 2 वर्षात खूप काही बदलले आहे. ही गोष्टी मी कुणासोबत शेअर करु शकत नाही. जगाला वाटते की सर्वकाही ठीक सुरु आहे... कारण ते फक्त आमच्या सोशल मीडिया पोस्ट किंवा स्टोरी पाहतात. जे सगळे खोटे आहे... जगाला चांगली प्रतिमा दाखवण्यासाठी हे टाकतो. पण हे सगळे खोटे आहे,' असे संदीपने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले.

इतकेच नाही तर संदीपने आपल्या पोस्टमध्ये एक विनंती करताना म्हटले की, “एक रिक्वेस्ट है…मेरे जाने के बाद कांचन को कुछ मत बोलना पर उसके दिमाग का इलाज जरुर करवा लेना”, असे त्याने सुसाइड नोटमध्ये नमूद केले आहे.

संदीपला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर पोलिसांना सूचना न देता त्याची पत्नी त्याचा मृतदेह घरी घेऊन गेली

गोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नाहरचे पार्थिव घेऊन त्याची पत्नी कांचन शर्मा दोन हॉस्पिलटमध्ये गेली होती. हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी संदीपला मृत घोषित केल्यानंतर कांचनने पोलिसांना माहिती न देता त्याचे पार्थिव घेऊन घरी परतली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, संदीपने आपल्या खोलीत दार बंद करुन गळफास घेतला होता. जेव्हा त्याच्या पत्नीला याबद्दल समजले, तेव्हा तिने कारपेंटरला बोलावून दार तोडले. संदीपच्या पत्नीसह आणखी दोघांनी मिळून त्याचे पार्थिव पंख्यावरुन खाली उतरवले आणि त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन गेले.

आत्महत्या प्रकरणामुळे संदीपला रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार देण्यात आला. यानंतर त्याला दुसर्‍या रुग्णालयात नेण्यात आले आणि तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर कांचनने संदीपचा मृतदेह घरी आणला आणि त्यानंतर पोलिसांना त्याविषयी माहिती दिली असल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमार्टमसाठी पाठविला आहे, जेणेकरुन मृत्यूचे कारण कळू शकेल.

बातम्या आणखी आहेत...