आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा जवळचा मित्र असल्याचे सांगणारा संदीप सिंह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निर्माता संदीप सिंह त्याच्याविरोधात पसरत असलेल्या अफवांमुळे वैतागला असून अशा बातम्या पसरवणा-यां विरोधात तो आता मानहानीचा खटला दाखल करणार आहे. हिती दिली की, संदीप आता अफवा पसरवणा-यांवर कारवाई करणार असल्याची माहिती त्याचे मीडिया मॅनेजर दीपक साहू यांनी ट्विटरवर दिली आहे.
#SandipSsingh to file a defamation case against those who are spreading rumors and are behind all the false allegations.
— Deepak Sahu (@deepaksahupr) September 1, 2020
वास्तविक, संदीप 10 महिन्यांपासून सुशांतच्या संपर्कात नव्हता, परंतु 14 जून रोजी सुशांतच्या मृत्यूनंतर तो त्याच्या घराबाहेर दिसला. तो शवागारातही उपस्थित होता आणि येथे तो पोलिसांशी बोलत होता. इतक्या दिवसांपासून सुशांतशी संपर्क नसलेला आणि अचानक त्याच्या मृत्यूनंतर अॅक्टिव झाल्याने मीडियाने जेव्हा प्रश्न उपस्थित केले तेव्हा त्याने कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिले नाही आणि तो गायब झाला.
वृत्तानुसार, संदीपच्या कॉल रेकॉर्डवरून सुशांतचा मृतदेह घेऊन जाणा-या रुग्णवाहिका चालकासोबत त्याचे बोलणे झाल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर सुशांतच्या अंत्यसंस्कारानंतर संदीप मुंबईतील तपास अधिका-यांसोबत बोलत होता. संदीपबद्दल सुशांतच्या कुटुंबीयांना विचारपूस केली असता त्यांनी संदीप कोण आहे हे त्यांना माहित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.