आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतचा अखेरचा चित्रपट:'दिल बेचारा'च्या शूटिंग दरम्यान सुशांत सिंह राजपूतवर करण्यात आलेल्या मीटूच्या आरोपांवर संजनाने सोडले मौन, म्हणाली - सत्य काय ते आम्हालाच माहित होते

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानही अनेक वाद निर्माण झाले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. तो आपल्यामागे अनेक प्रश्न सोडून गेला आहे, ज्याची उत्तरे अद्याप सापडलेली नाहीत. दरम्यान, येत्या 24 जुलै रोजी सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.

या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानही अनेक वाद निर्माण झाले होते. चित्रीकरणादरम्यान अभिनेत्री संजना सांघीने सुशांत सिंह राजपूत आणि दिग्दर्शक मुकेश छाबरा यांच्यावर गैरवर्तन आणि लैंगिक छळाचा आरोप केला होता.

संजनाने नंतर या वृत्ताचे खंडन करत सुशांत आणि मुकेश यांना क्लीन चिट दिली होती. आता संजनाने मौन सोडले असून सत्य परिस्थिती कथन केली आहे. अलीकडेच पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. 

  • सुशांत आणि मला मनस्ताप झाला होता 

संजनाने पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सुशांतविषयी त्या केवळ अफवा होत्या, असे म्हटले आहे. मुलाखतीत तिने सांगितले, प्रत्येकाला असे वाटले की सुशांतला यामुळे बराच त्रास झाला. पण एकटा सुशांतच नाही तर मलासुद्धा या गोष्टीचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. कारण सत्य काय आहे, हे फक्त आम्हा दोघांनाच ठाऊक होते. आमच्यातील मैत्री कशी आहे आणि त्या मैत्रीचं महत्त्व काय आहे हे आम्हालाच माहित होते. आम्ही दररोज शूट करत होतो. जेव्हा दररोज आमच्याबद्दल 1-2 लेख हमखास छापून येत होते. तेव्हा आम्ही त्याकडे लक्ष दिले नाही. पण जेव्हा सगळीकडे याच बातम्या येऊ लागल्या ज्या निराधार होत्या, तेव्हा मला त्या बातम्या लिहिणा-यांविषयी आदर राहिला नाही.'

  • आमच्या बाँडिंगवर याचा परिणाम झाला नाही -संजना 

संजना पुढे म्हणाली, ''या सर्व गोष्टींचा सुशांत आणि माझ्या बाँडिंगवर काहीही परिणाम झाला नाही. आमची मैत्री कायम ठेवली आणि त्याच्यावर जे आरोप करण्यात आले होते, तसे आमच्यात काहीच झाले नव्हतं. माहित नाही पण अशा गोष्टींची चर्चा का होऊ लागली आणि त्याच्यावर आरोप करण्यात आले. आम्ही सतत हाच विचार करायचो की लोकांना कसे समजवायचे की आमच्यात सगळे ठीक आहे. या सगळ्या अफवा आहेत. त्यावेळी एक वेगळीच परिस्थिती आमच्यासमोर निर्माण झाली होती.” 

सुशांतने आमच्या संभाषणाचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर शेअर करुन त्याच्यावरील लैंगिक छळाच्या आरोपाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही, असेही संजना म्हणाली. 

  • संजनाने 2018 मध्ये दिले होते स्पष्टीकरण 

यानंतर, संजनाने 2018 मध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण देताना म्हटले होते की, माझ्यासोबत गैरवर्तन झालेले नाही, त्यामुळे या निराधार बातम्यांना पूर्णविराम द्या.