आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजु बाबाला कोरोनाची भिती:संजय दत्त आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची पाहतोय आतुर्तेने वाट; प्रेषकांना सिनेमागृहात चित्रपट पाहण्याची संधी मिळावी

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेते संजय दत्त यांची यावर्षी तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची संजय दत्त यांनी अतुरतेने प्रतिक्षा आहे. मात्र कोरोनाने संजय दत्त यांच्या चिंतेते आणखीणच भर पाडली आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत असताना अनेक भागात चित्रपटगृहे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तर काही ठिकाणी क्षमतेच्या केवळ 50% उपस्थितीत सिनेमागृहे सुरु आहे. संजय दत्तने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, आगामी काळात येणाऱ्या माझ्या तिन्ही चित्रपटांना मोठ्या पडद्यासाठी तयार करण्यात आले आहे. कारण प्रेषकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्यास वेगळाच आनंद मिळतो. गेल्या अनेक वर्षांपासून संजय दत्त यांचे एकही चित्रपट सिनेमाघरात प्रदर्शित झालेला नाही. 2019 साली 'पानीपत' हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता.

रिलीजची वाट पोहतोय
मुलाखतीत संजयने म्हटले आहे की, यावर्षी 'शमशेरा', 'केजीएफ-2' आणि 'पृथ्वीराज' हे चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत. हे तिन्ही चित्रपट खुपच शानदार असून, याच्या प्रदर्शनाची मी आतुर्तेने वाट पाहत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढढत असल्याने आम्ही घेतलेले निर्णय ठप्प झाले आहेत. हे तिन्ही चित्रपट मोठ्या पडद्यासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या सिनेमांचा आनंद घेण्यासाठी प्रेषकांना चित्रपट गृहात जावे लागणार आहे. लवकरच कोरोनाचे संकट दुर व्हावे. अशी प्रार्थना करतो. असे संजय दत्तने म्हटले आहे.

OTT चे आभार

OTT प्लेटफॉर्मवर प्रदर्शित करणार का? यावर संजय दत्त म्हणाले की, "मी OTT ला धन्यवाद करु इच्छितो की, गेल्या वर्षी माझे तीन चित्रपट 'सड़क-2', 'तोरबाज' आणि 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' OTT वर प्रदर्शित करण्यात आले. मात्र मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे प्रेषक चित्रपटाचा चांगल्या प्रकारे आनंद घेता. मात्र OTT हे देखील एक चांगले माध्यम असून, प्रेषक वर्ग याद्वारे हवे ते सिनेमे याद्वारे पाहू शकतात." असे संजयने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...