आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:अभिषेक बच्चन घरी, संजय दत्त रुग्णालयात; संजूबाबाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्वसनाचा त्रास होत असल्याने संजय दत्त रुग्णालयात दाखल

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. गेले २८ दिवस नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही माहिती चाहत्यांना दिली. ‘एक वचन हे एक वचनच असतं. आज माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं होतं मी कोरोनावर मात करेन, असे ट्विट अभिषेकने केले आहे. दरम्यान, चित्रपट अभिनेता संजय दत्तला श्वसनाचा त्रास होत असल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण घटले होते. तसेच अस्वस्थही वाटत होते. त्याची अँटिजन टेस्ट केली असता तो कोरोना निगेटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

बातम्या आणखी आहेत...