आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या मृत्यूनंतर चाललेल्या मोहिमेचा परिणाम:युट्यूबवर 'सडक 2'च्या ट्रेलरला करण्यात आले सर्वाधिक नापसंत, डिसलाइकच्या तुलनेत लाइक  6% पेक्षाही कमी; पूजा भट्ट म्हणाली..

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट येत्या 28 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे

संजय दत्त, पूजा भट्ट, आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'सडक 2' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होऊन 24 तासांहून अधिकचा काळ लोटला आहे. गुरुवारी संध्याकाळी 4:41 पर्यंत यूट्यूबवर या चित्रपटाच्या ट्रेलरला कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. खास गोष्ट म्हणजे ट्रेलर रिलीज होताच याला लाखो डिसलाइक्स मिळाले आहे. या ट्रेलरने डिसलाइक्सचा रेकॉर्ड मोडला असून बॉलिवूडमध्ये आतापर्यंत सर्वाधिक डिसलाइक झालेला हा ट्रेलर ठरला आहे. ट्रेलरला डिसलाइक करणा-यांची स्ख्या लाइक करणा-यांच्या तुलनेत 18 टक्क्यांहून अधिक आहे.

  • 65 लाखांहून अधिक लोकांना केले डिसलाइक

हा ट्रेलर फॉक्स स्टार हिंदीने त्यांच्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केला आहे. या चॅनेलचे 53 लाखांंहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. परंतु 'सडक 2'च्या ट्रेलर ला नापसंत करणा-यांची संख्या 65 लाखांपेक्षा जास्त आहे. तर लाइक करणा-यांची संख्या साडेतीन लाख आहे. तुलनात्मकदृष्ट्या लाइक करणा-यांची संख्या डिसलाइक करणा-यांच्या तुलनेत केवळ 5.3% आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये पेटलेल्या घराणेशाहीच्या वादामुळे ट्रेलरला इतका वाईट प्रतिसाद मिळाल्याचे मानले जात आहे. स्टार किड्स आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते यांच्यावर सुशांतच्या चाहत्यांनी निशाणा साधला. खास करुन महेश भट्ट यांच्या कुटुंबीयांना ट्रोल करण्यात आले.

  • पूजा भट्टची प्रतिक्रिया

ट्रेलरला सर्वाधिक डिसलाइक मिळाल्यानंतर पूजा भट्टने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘प्रेम करणारे आणि राग करणारे लोकं हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही दोघांनीही आम्हाला तुमचा मौल्यवान वेळ दिलात आणि चित्रपट टॉप ट्रेंडमध्ये असल्याची खात्री करुन दिली त्याबद्दल तुमचे आभार’ असे पूजा भट्टने ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • नेमोमीटरवर 98% लोकांनी नेपोटिस्टिक ठरवला होता 'सडक 2'

सुशांतच्या मृत्यूने नेपोटिज्मचा मुद्दा चर्चेत आला. सुशांतचे भावोजी विशाल किर्ती यांनी याविरोधात लढा देण्यासाठी एक नेपोमीटर तयार केला. त्यात पाच कॅटेगरीतून चित्रपटात किती लोक नेपोटिज्मच्या माध्यमातून आले, हे शोधता येते. या मोहिमेत चित्रपटाला प्रथम रेटिंग देण्यात आली होती. 98 टक्के लोकांनी चित्रपटाला नेपोटिस्टिक म्हटले होते. कारण याच्या पाचपैकी 4 कॅटेगरीतील लोक निपोटिज्मच्या माध्यमातून इंडस्ट्रीत आले.

  • अशी आहे सडक 2 ची रेटिंग

निर्माता - महेश भट्ट, वडील - नानाभाई भट्ट (दिग्दर्शक)

लीड कास्ट- आलिया भट्ट, वडील - महेश भट्ट (दिग्दर्शक, निर्माता), आई- सोनी राजदान (अभिनेत्री)

संजय दत्त, वडील- सुनील दत्त (अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, राजकारणी), आई - नर्गिस (अभिनेत्री)

आदित्य रॉय कपूर, भाऊ- सिद्धार्थ रॉय कपूर (निर्माता)

पूजा भट्ट - वडील- महेश भट्ट (दिग्दर्शक, निर्माता)

सपोर्टिंग कास्ट - गुलशन ग्रोव्हर (सेल्फ मेड)

दिग्दर्शक- महेश भट्ट, वडील- नानाभाई भट्ट (दिग्दर्शक)

लेखक- महेश भट्ट, वडील- नानाभाई भट्ट (दिग्दर्शक)

हा चित्रपट येत्या 28 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे

महेश भट्ट दिग्दर्शित 'सडक 2' हा चित्रपट 1991 मध्ये आलेल्या संजय दत्त, पूजा भट्ट स्टारर 'सडक'चा सिक्वेल आहे. हा चित्रपट 28 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉट-स्टारवर रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...