आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजूचे हेल्थ अपडेट:जुळी मुले इकरा आणि शाहरान यांच्या 10 व्या वाढदिवशी संजय दत्तची खास भेट, निवेदन जारी करुन म्हणाला - 'मी लढाई जिंकून परत आलो आहे'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय दत्तने एका पोस्टच्या माध्यमातून या बातमीला दुजोरा दिला आहे.

दोन दिवसांपूर्वीच अभिनेता संजय दत्तचा कर्करोग बरा झाल्याची बातमी समोर आली होती. 61 वर्षीय संजू पॉझीट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) चाचणीत कर्करोगमुक्त असल्याचे दिसून आले आहे. दोन दिवसांनंतर म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी त्याने एका पोस्टच्या माध्यमातून या बातमीला दुजोरा दिला असून जुळ्या मुलांच्या वाढदिवसाची ही सर्वात मोठी भेट असल्याचे म्हटले आहे. दोन महिन्यांपूर्वीच संजय दत्तला 2 चौथ्या स्टेजचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते.

  • संजयने सर्वांचे आभार मानले

आपल्या पोस्टमध्ये संजयने लिहिले, ''गेले काही आठवडे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. परंतु असे म्हटले जात नाही की देव सर्वात शक्तिशाली सैनिकाला सर्वात कठीण संघर्षासाठी निवडतो. म्हणूनच आज माझ्या मुलांच्या वाढदिवशी मला खूप आनंद झाला आहे की मी ही लढाई जिंकण्यात यशस्वी झालो आहे आणि मी हा लढा जिंकून त्यांना सर्वात चांगली भेट देऊ शकलो आहे'', अशा शब्दांत संजूने आपल्या भावना व्यक्त केला आहेत.

संजू पुढे म्हणाला, ''आपल्या सर्वांच्या मदतीशिवाय आणि विश्वासाशिवाय हे शक्य झाले नसते. मी माझ्या कुटुंबातील, मित्र आणि चाहत्यांचा आभारी आहे, जे माझ्या पाठीशी कायम उभे होते आणि जे या कठीण काळात माझे सामर्थ्य बनले. आपल्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद. गेल्या काही आठवड्यांपासून माझी काळजी घेणा-या डॉ. शेवंती आणि त्यांच्या टीमचे मी विशेष आभार मानतो.''

  • रुग्णालयाशी संबंधित सूत्रांनीही याची पुष्टी केली

कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या संजूच्या संदर्भात सूत्रांनी सांगितले की- "वास्तविक कर्करोगाच्या पेशींमध्ये कर्करोग नसलेल्या पेशींपेक्षा मेटाबोलिक दर जास्त असतो. या उच्च स्तरावरील रासायनिक क्रियेमुळे कर्करोगाच्या पेशी पीईटी स्कॅनवर चमकणा-या डागासारख्या दिसतात. यामुळे पीईटी स्कॅन कर्करोगाचा शोध घेण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरात कर्करोग किती पसरला आहे, हेदेखील यातून कळू शकते.' संजूचा हाच रिपोर्ट दर्शवतो की तो आता कर्करोगमुक्त झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...