आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2006 मध्ये रिलीज झालेल्या 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटाच्या 15 वर्षानंतर संजय दत्त, अर्शद वारसी आणि बोमन इराणी हे त्रिकुट पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. मात्र हा मुन्नाभाई सीरिजचा दुसरा चित्रपट नाही. तिघेही यावेळेस आनंद पंडित यांच्या ब्लॉकबस्टर गँग या चित्रपटात सोबत दिसणार आहेत. चित्रपटात संजय एका वेगळ्या गँगस्टच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा लूकदेखील खूपच वेगळा असणार आहे. चित्रपटाचे 80 टक्के शूटिंग लंडनमध्ये आणि उर्वरित 20 टक्के भारतात होणार आहे.
हा ब्लॅक कॉमेडी जॉनरचा चित्रपट आहे, ज्याची कथा डॉन बनलेल्या संजयच्या व्यक्तिरेखेभोवती विणली गेली आहे. नावानुसार हा चित्रपट अॅक्शन आणि गँगवर आधारित आहे. यात थरार , अॅक्शन आणि विनोद दिसणार आहे. निर्मात्यांनी यासाठी संजय मिश्रा आणि जॉनी लिव्हर सारख्याविनोदी कलाकारांनाही घेतले आहे. अजून कोणत्याही अभिनेत्रीला या चित्रपटासाठी घेण्यात आलेले नाही.
चित्रपटाचे 80 टक्के चित्रीकरण हे लंडनमध्ये होणार आहे. जुलैच्या उत्तरार्धात निर्माते तेथे शूट करणार आहेत. लंडनमध्ये जागेची निवड झाली. उर्वरित 20 टक्के शूटिंग भारतातील मुंबई, दिल्ली, गोवा इत्यादी शहरात केले जाईल. कोविड परिस्थितीमुळे सर्वकाही ठप्प झाले आहे.
यात संजय एका वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. शिवाय वेगळी अॅक्शन करतानाही दिसणार आहे. या दृश्यासाठी तो विशेष प्रशिक्षण घेणार आहे. या पात्रासाठी तो दोन वेगळ्या लूकमध्ये दिसेल. मात्र अद्याप त्यापैकी काहीही निश्चित झालेले नाही.
कोरोनामुळे फिल्म मेकिंग प्रोसेस पूर्णपणे बदलली आहे. आतापर्यंत चित्रपट बनवत होतो आणि जेथे जास्त पैसा यायचा तेथे रिलीज करत होतो. मात्र आता कोणता चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करायचा आणि कोणता ओटीटीवर हे आधीच ठरवावे लागते. त्याच्यानुसारच, सेटअप आणि खर्च करावा लागतो. कारण हा एक विनोदी चित्रपट आहे. त्यामुळे आम्ही हा थिएटरमध्ये रिलीज करण्याचा विचार करत आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.