आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय दत्तच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी:61 वर्षीय संजूने कॅन्सरचा केला पराभव, दोन महिन्यांपूर्वी चौथ्या स्टेजच्या कॅन्सरचे झाले होते निदान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजयच्या जवळच्या मित्राने दिव्य मराठीला हे वृत्त दिले.
  • सोमवारी संजयचे पीईटी स्कॅन झाले.

अभिनेता संजय दत्तच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. संजय दत्तने कर्करोगाचा पराभव केला आहे. संजय दत्तचे जवळचे मित्र आणि ट्रेड अ‍ॅनालिस्ट राज बन्सल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, सोमवारी, 61 वर्षीय संजूचे पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) स्कॅन झाले असून त्याच्या रिपोर्टमध्ये संजू आता कर्करोगमुक्त असल्याचे समोर आले आहे. पीईटी स्कॅन ही सर्वात ऑथेंटिक तपासणी समजली जाते. त्यातून कर्करोगाने पीडित व्यक्तीच्या कर्करोगाच्या पेशींची स्थिती काय आहे हे समजते. संध्याकाळपर्यंत संजय दत्त आणि मान्यता दत्त अधिकृत माहितीही शेअर करू शकतात.

रुग्णालयाच्या सूत्रांनी काय सांगितले?

रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, "वास्तविक कर्करोगाच्या पेशींमध्ये कर्करोग नसलेल्या पेशींपेक्षा मेटाबोलिक दर जास्त असतो. या उच्च स्तरावरील रासायनिक क्रियेमुळे कर्करोगाच्या पेशी पीईटी स्कॅनवर चमकणा-या डागासारख्या दिसतात. यामुळे पीईटी स्कॅन कर्करोगाचा शोध घेण्यासाठी उपयुक्त आहे. शरीरात कर्करोग किती पसरला आहे, हेदेखील यातून कळू शकते."

अलीकडेच संजू म्हणाला होता - मी याचा नक्की पराभव करेल

अलीकडेच संजय दत्तने आपल्या आजाराविषयी मन मोकळे केले होते. सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अलीम हाकीम यांनी अलीकडेच संजूचे दोन व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले होते. एका व्हिडिओमध्ये संजय दत्तने सर्वांना अलीमची ओळख करुन देत आपल्या कपाळाची खुण दाखवली होती. सोबतच तो म्हणाला होता की, "तुम्ही जर हे पाहिले तर ही माझ्या आयुष्यातील नवीन खूण आहे. परंतु मी त्याचा पराभव करेन आणि लवकरच कर्करोगातून मुक्त होईल."

11 ऑगस्ट रोजी कर्करोगाचा खुलासा झाला होता

संजय दत्तला श्वासोच्छ्वासाच्या त्रासानंतर 8 ऑगस्ट रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्याच्या काही चाचण्या घेण्यात आल्या. तीन दिवसांनंतर, 11 ऑगस्ट रोजी त्याला फुप्फुसांच्या कर्करोगाचे निदान झाले होते.

कोकिलाबेन रुग्णालयात सुरु होते उपचार

वृत्तानुसार संजूला चौथ्या स्टेजचा कर्करोग होता आणि त्याच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याने किंवा त्याच्या कुटुंबियांनी याची पुष्टी केलेली नाही. संजूच्या आजाराची बातमी माध्यमांमध्ये आल्यानंतर त्याची पत्नी मान्यताने एक अधिकृत निवेदन जारी करुन लोकांना अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले होते.

मान्यताने पोस्टमध्ये लिहिले होते- संजूच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणा-या सर्वांचे मी आभार मानते. या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला तुमच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे. या कुटुंबाने यापूर्वी खूप सहन केले आहे, परंतु मला खात्री आहे की ही वेळ देखील निघून जाईल. माझी सर्वांना विनंती आहे की, संजूच्या चाहत्यांनी कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये.

बातम्या आणखी आहेत...