आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेल्थ अपडेट:संजय दत्तने वैद्यकीय उपचारांसाठी घेतला कामापासून ब्रेक, चाहत्यांना म्हणाला - माझ्या प्रकृतीविषयी चिंता करु नका

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारीच संजय दत्तला लीलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला होता.

शनिवारी रात्री श्वास घ्यायला त्रास झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेता संजय दत्तने आज कामापासून छोटा ब्रेक घेत असल्याची घोषणा केली. मंगळवारी संध्याकाळी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्याने ही माहिती दिली. वैद्यकीय उपचारांसाठी कामापासून ब्रेक घेत असल्याचे तो म्हणाला आहे.

आपल्या पोस्टमध्ये संजय दत्तनेने लिहिले, ‘नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेत आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका असं आवाहन मी चाहत्यांना करतो. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईन’, असे ट्विट संजयने केले आहे.

  • सोमवारीच मिळाला डिस्चार्ज

संजय दत्तला सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे त्याला 8 ऑगस्ट रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याची कोविड - 19 ची चाचणीही झाली होती, जी निगेटिव्ह आली होती.

  • पहिला रिपोर्ट आला होता निगेटिव्ह

संजय दत्तला लिलावती रुग्णालयातील नॉन कोविड आयसीयू वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते. संजय दत्तला मुख्यत: श्वसनाचा त्रास जाणवत होती. त्याची ऑक्सिजन लेवल कमी जास्त होत होती. संजय दत्तला कोरोना सदृश्य लक्षणे जाणवल्याने तातडीनं रॅपिड अॅण्टीजेन चाचणी करण्यात आली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणीसाठी स्वॅब घेण्यात आला होता. त्याचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला. संजयने शनिवारी रात्री ट्विट करुन आपल्या तब्येतीची माहिती चाहत्यांना दिली होती.

  • संजू बाबा मुंबईत एकटाच आहे

संजय दत्त मुंबईत एकटाच राहत आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यापासून त्याची पत्नी मान्यता आणि दोन्ही मुले इकरा आणि शाहरान दुबईमध्ये अडकले आहेत. फोन कॉल्स आणि ऑनलाइन व्हिडिओ कॉलिंगद्वारे ते संजयच्या संपर्कात असतात.

  • संजूला कोणताही त्रास नव्हता

रविवारी संजयचा निकटवर्तीय आणि चित्रपट दिग्दर्शक अजय अरोरा उर्फ ​​बिट्टू यांनी दैनिक भास्करला सांगितले की, 'संजूला कोणताही मोठा त्रास नाही. बदलत्या हवामानामुळे त्याला थोडा त्रास झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व चाचण्या करुन घ्याव्या असा विचार त्याने केला. त्याची कोविडची चाचणीही झआली. ती निगेटिव्ह आली', अशी माहिती बिट्टू यांनी दिली होती.

संजय दत्तचा आगामी सडक 2 हा चित्रपट येत्या 28 ऑगस्ट रोडी डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...