आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हेल्थ अपडेट:संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग असल्याबद्दल दोन प्रकारची चर्चा सुरु, परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी कुटुंबीय आज अधिकृत माहिती देणार

अमित कर्ण, मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 ऑगस्ट रोजी श्वास घ्यायला त्रास होत असल्याने संजय दत्तला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
  • सर्व चाचण्या झाल्यानंतर सोमवारी त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

मंगळवारी रात्री अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान झाल्याची बातमी आली. त्याचा हा आजार स्टेज 3 मध्ये असल्याचे बोलले जात आहे. दैनिक भास्करसोबत झालेल्या एका बातचीतमध्ये संजयच्या जवळच्या मित्राने मात्र या बातमीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, संजय दत्तची अद्याप बायोप्सी टेस्ट झालेली नाही. त्यामुळे त्याला फुफ्फुसांच्या कर्करोग झाल्याचे कसे बोलले जात आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आता बातमी आहे की, संजयचे कुटुंबीय आज (बुधवारी) अधिकृत माहिती देऊन परिस्थिती स्पष्ट करतील.

संजयच्या मित्राने सांगितले की, 'त्याची कोरोनाची दुस-यांदा चाचणी करण्यात आली होती. दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या. सध्या तो मुंबईतच आहे.' यापूर्वी संजय पुढील उपचारांसाठी अमेरिकेला रवाना झाला आहे, अशी देखील बातमी आली होती.

  • सोमवारी दुपारीच कामातून ब्रेक घेत असल्याची संजयने केली होती घोषणा

सोमवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर संजय दत्तने मंगळवारी दुपारी कामापासून छोटा ब्रेक घेत असल्याची घोषणा केली होती. मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्याने ही माहिती दिली. वैद्यकीय उपचारांसाठी कामापासून ब्रेक घेत असल्याचे तो म्हणाला होता.

आपल्या पोस्टमध्ये संजय दत्तनेने लिहिले, ‘नमस्कार मित्रांनो, काही वैद्यकीय उपचारांसाठी मी कामापासून छोटा ब्रेक घेत आहे. माझे कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी माझ्यासोबत असून माझ्या प्रकृतीविषयी चिंता करू नका असं आवाहन मी चाहत्यांना करतो. त्याचप्रमाणे तब्येतीविषयी काही अफवा पसरवू नका. तुमच्या प्रेमाच्या आणि शुभेच्छांच्या आधारे मी लवकरच परत येईन’, असे ट्विट संजयने केले होते.

View this post on Instagram

🙏🏻

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on Aug 11, 2020 at 4:09am PDT

  • सोमवारीच मिळाला डिस्चार्ज

संजय दत्तला सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे त्याला 8 ऑगस्ट रोजी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्याची कोविड - 19 ची चाचणीही झाली होती, जी निगेटिव्ह आली होती. रविवारी संजयचा निकटवर्तीय आणि चित्रपट दिग्दर्शक अजय अरोरा उर्फ ​​बिट्टू यांनी दैनिक भास्करला सांगितले होते की, 'संजूला कोणताही मोठा त्रास नाही. बदलत्या हवामानामुळे त्याला थोडा त्रास झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर सर्व चाचण्या करुन घ्याव्या असा विचार त्याने केला. त्याची कोविडची चाचणीही झाली. ती निगेटिव्ह आली', अशी माहिती बिट्टू यांनी दिली होती.