आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता 'हेरा फेरी' करताना दिसणार संजय दत्त:चित्रपटाच्या तिसऱ्या भागात झळकणार, स्वतः केला खुलासा

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल स्टारर हेरा फेरी या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. नुकतीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. या त्रिकुटासोबत अभिनेता संजय दत्तदेखील मोठ्या पडद्यावर हेरा फेरी करताना दिसणार आहे. होय या चित्रपटात संजू बाबाची वर्णी लागली आहे. स्वतः संजयने एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.

एका मुलाखतीत संजय दत्तला ‘हेरा फेरी’ चित्रपटाबद्दल विचारले असता तो म्हणाला, "होय मी हा चित्रपट करत आहे. या टीमबरोबर काम करण्यासाठी मी उत्सुक आहे. ही एक उत्तम फ्रँचायझी आहे आणि मला आनंद होत आहे की मी याचा भाग आहे, फिरोझ आणि माझे संबंध खूप जुने आहेत. तसेच अक्षय कुमार, सुनील अण्णा, परेश रावल यांच्याबरोबर एकत्र असणे खूप छान असते," अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

तर दुसरीकडे सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "संजय दत्तने विनोदी भूमिकादेखील उत्तमरित्या निभावल्या आहेत. ‘हेरा फेरी’ युनिव्हर्समध्ये आणखी एक नवा ट्विस्ट आणि धमाल आणण्यासाठी निर्मात्यांनी घेतलेला हा निर्णय खूप योग्य आहे."

संजय दत्त नकारात्मक भूमिकेत असेल अशी चर्चा आहे. त्याच्या भूमिकेत एक ट्विस्टही आहे. संजयची एंट्रीने हा चित्रपट आणखी रंजक होणार आहे. गेल्यावर्षी तो ‘केजीएफ 2' मध्येही नकारात्मक भूमिकेत दिसला होता. ‘हेरा फेरी 4'चे चित्रीकरण पुढील ३ महिन्यांत पूर्ण होईल. मुंबईसह विदेशांतही चित्रीकरण केले जाणार आहे.

'हेरा फेरी 4'च्या सेटवर अक्षय, परेश रावल आणि सुनील शेट्टी चित्रपटाच्या क्रूसोबत दिसत आहेत.
'हेरा फेरी 4'च्या सेटवर अक्षय, परेश रावल आणि सुनील शेट्टी चित्रपटाच्या क्रूसोबत दिसत आहेत.

यापूर्वी अक्षय कुमारने हा चित्रपट सोडल्याची चर्चा होती. त्याच्या जागी अभिनेता कार्तिक आर्यनची वर्णी लागली होती. पण नंतर निर्मात्यांनी समजूत घातल्यानंतर अक्षयने चित्रपटाला होकार दिला. दरम्यान या चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात अक्षय, सुनील आणि परेश चित्रपटातील लूकमध्ये दिसले होते. फिरोज नाडियाडवाला यांच्या मुंबईतील एम्पायर स्टुडिओमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा करण्यात आला.

17 वर्षांनंतर येतोय चित्रपटाचा तिसरा भाग
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांचा हा चित्रपट 2000 मध्ये प्रदर्शित झाला होता. 2006 मध्ये या फ्रेन्चायझीचा दुसरा चित्रपट ‘हेरा फेरी 2’ प्रदर्शित झाला. आता प्रेक्षक ‘हेरा फेरी’च्या तिसऱ्या भागासाठी उत्सुक आहेत. विशेष म्हणजे निर्मात्यांनी चित्रपटाचे शीर्षक 'हेरा फेरी 3' न ठेवता 'हेरा फेरी 4' असे ठेवले आहे.

बातम्या आणखी आहेत...