आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेटवर अपघात:चित्रपटाच्या सेटवर अ‍ॅक्शन सीनच्या शूटवेळी गंभीर जखमी झाला संजय दत्त, चेहऱ्यासह हातापायाला दुखापत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता संजय दत्तच्या चाहत्यांना काळजीत टाकणारी बातमी आली आहे. बंगळुरू येथे एका चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीनचे चित्रीकरण करत असताना संजय दत्त जखमी झाला आहे. संजय सध्या बंगळुरू येथे आगामी 'केडी : द डेविल' या कन्नड चित्रपटाचे शूटिंग करत होता. याच चित्रपटातील स्फोटक दृश्याच्या चित्रीकरणादरम्यान हा अपघात घडला.

चेहऱ्याला दुखापत
वृत्तानुसार, या अपघातात संजय दत्त गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या चेहऱ्यासह, हात आणि कोपऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. फाइट मास्टर रवी वर्मा 'केडी : द डेविल' या चित्रपटाच्या फाइट सीन्सचे दिग्दर्शक आहेत.

संजय दत्तचे चित्रपट
संजय दत्त यापूर्वी 'केजीएफ' चॅप्टर 1 आणि 2 मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. त्याचे हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले होते. यात त्याच्यासह रवीना टंडन झळकली होती. आगामी 'केडी : द डेविल' या कन्नड चित्रपटात संजय पुन्हा एकदा खलनायकाची भूमिका साकारतोय. तो शेवटचा रणबीर कपूर आणि वाणी कपूर स्टारर 'शमशेरा' या चित्रपटात दिसला होता. मात्र संजयचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.