आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या संजय दत्त सध्या त्याच्या आगामी 'KGF: Chapter 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजय दत्तने KGF-2 मधील त्याच्या 'अधीरा' या पात्राशी संबंधित काही गोष्टी शेअर केल्या आहेत. यासोबतच संजयने कॅन्सरशी झुंज देत असताना चित्रपटाचे शूटिंग केले होते. त्याबद्दलचे अनुभवही त्याने सांगितले आहेत.
निर्मात्यांनी मला खूप सहकार्य केले
2020 मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या यशस्वी लढ्याबद्दल बोलताना संजय दत्त म्हणाला, "KGF-2 ची टीम खूप 'फ्रेंडली' होती. कर्करोगाच्या उपचारानंतर पुन्हा काम सुरू करताना खूप आनंद झाला आहे. निर्मात्यांनी मला कम्फर्टेबल वाटावे यासाठी शक्य ते सर्व केले," असे संजयने सांगितले.
कॅन्सरशी झुंज देत असताना चित्रपटाच्या कठीण क्लायमॅक्सचे चित्रीकरण केले
संजय दत्त पुढे म्हणाला, "निर्मात्यांनी मला ग्रीन क्रोमावर शूट करण्याचा सल्ला दिला होता. पण एक अभिनेता म्हणून हा चित्रपट योग्य प्रकारे शूट करणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे होते. त्यासाठी आमच्याकडे खूप मोठे व्हिजन होते. क्लायमॅक्स भव्य स्केलवर चित्रीत करायचा होता. हे एक कठीण ग्रॅण्ड व्हिजन होते - चिखल, धूळ, आग आणि बरीच अॅक्शन. त्याशिवाय मी ते शूट करू शकत नव्हतो. फुफ्फुसाच्या कर्करोगाशी लढा देत असताना मी चित्रपटाचा कठीण क्लायमॅक्स चित्रीत केला होता."
'अधीरा' या भूमिकेबद्दल संजय दत्त म्हणाला, "तो अतिशय धोकादायक आहे, परंतु त्याच वेळी काही लोकांसाठी तो चांगलादेखील आहे. यश आणि मी प्रत्येक सीन उत्साहात केला आहे. तो खूप प्रतिभावान अभिनेता आहे." कॅन्सरशी लढा दिल्यानंतर नव्या ऊर्जेने कामावर परतल्याचेही संजयने सांगितले. याचे श्रेय तो त्याच्या चाहत्यांना देतो. माझ्या चाहत्यांच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद, असे संजय म्हणाला आहे.
14 एप्रिलला रिलीज होणार आहे 'KGF-2'
काही दिवसांपूर्वीच 'KGF-2' चा ट्रेलर रिलीज झाला होता. या चित्रपटाच्या ट्रेलरनेही अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. 'KGF-2' चा ट्रेलर 24 तासांत सर्वाधिक पाहिला जाणारा भारतीय ट्रेलर ठरला आहे. 'केजीएफ-1'च्या यशानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात संजय दत्त व्यतिरिक्त यश, श्रीनिधी शेट्टी आणि रवीना टंडन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 14 एप्रिल 2022 रोजी हिंदी, तेलुगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.