आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅन्सरवर मात केल्यानंतरचा संजय दत्तचा पहिला फोटो:कोकिलाबेन हॉस्पिटलमधून घरी परतला 61 वर्षीय संजू, मुलांच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे झाला सामील

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय दत्त आता पुर्णपणे बरा झाला आहे.

61 वर्षीय बॉलिवूड अभिनेता संजय दत्त कॅन्सरवर मात करुन कोकिलाबेन हॉस्पिटलमधून आपल्या घरी परतला आहे. बुधवारी धाकटी बहीण प्रिया दत्तसह तो दिसला. यावेळी संजूने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पांढरा पायजाम परिधान केला होता. पापाराझीला पाहून त्याने हसत हात हलवून अभिवादन केले.

  • व्हिडिओ कॉलद्वारे मुलांच्या बर्थडे सेलिब्रेशनमध्ये झाला सामील

दरम्यान, संजय दत्तची पत्नी मान्यताने त्यांची जुळी मुले शाहरान आणि इकरा यांच्या 10 व्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो इंस्टा स्टोरीवर शेअर केले आहेत. यातील एका फोटोत संजय दत्त व्हिडिओ कॉलद्वारे सेलिब्रेशनमध्ये सामील झालेला दिसतोय. मान्यता आपल्या दोन्ही मुलांसह सध्या दुबईत आहे.

  • बुधवारी स्वतः संजय दत्तने दिले होते हेल्थ अपडेट

बुधवारी एका पोस्टच्या माध्यमातून स्वतः संजयने आपल्या तब्येतीविषयीची माहिती चाहत्यांना दिली होती. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते, ''गेले काही आठवडे माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होते. परंतु असे म्हटले जात नाही की देव सर्वात शक्तिशाली सैनिकाला सर्वात कठीण संघर्षासाठी निवडतो. म्हणूनच आज माझ्या मुलांच्या वाढदिवशी मला खूप आनंद झाला आहे की मी ही लढाई जिंकण्यात यशस्वी झालो आहे आणि मी हा लढा जिंकून त्यांना सर्वात चांगली भेट देऊ शकलो आहे'', अशा शब्दांत संजूने आपल्या भावना व्यक्त केल्या.

संजू पुढे म्हणाला, ''आपल्या सर्वांच्या मदतीशिवाय आणि विश्वासाशिवाय हे शक्य झाले नसते. मी माझ्या कुटुंबातील, मित्र आणि चाहत्यांचा आभारी आहे, जे माझ्या पाठीशी कायम उभे होते आणि जे या कठीण काळात माझे सामर्थ्य बनले. आपल्या प्रेमासाठी आणि आशीर्वादासाठी खूप खूप धन्यवाद. गेल्या काही आठवड्यांपासून माझी काळजी घेणा-या डॉ. शेवंती आणि त्यांच्या टीमचे मी विशेष आभार मानतो.''

  • सर्वप्रथम दिव्य मराठीने दिली होती संजय दत्त बरा झाल्याची बातमी

संजय दत्तने कॅन्सरवर मात केल्याची बातमी सर्वप्रथम दिव्य मराठीने दिली होती. सोमवारी संजयचे जवळचे मित्र आणि ट्रेड अॅनालिस्ट राज बन्सल यांनी आम्हाला सांगितले होते की, संजय दत्त आता पुर्णपणे बरा झाला आहे. याशिवाय कोकिलाबेन हॉस्पिटलच्या सूत्रांनीही याला दुजोरा दिला होता. त्यांनी सांगितल्यानुसार पॉझीट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) चाचणीत तो कर्करोगमुक्त असल्याचे दिसून आले आहे.

  • 11 ऑगस्ट रोजी कॅन्सरचे निदान झाले होते

संजय दत्तला 8 ऑगस्ट रोजी श्वासोच्छ्वासात त्रास झाल्याने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या काही चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 11 ऑगस्ट रोजी त्याला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.