आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्डन मोमेंट:संजय दत्तला यूएई सरकारकडून मिळाला गोल्डन व्हिसा, 10 वर्षांसाठी मिळते गल्फ कंट्रीजमध्ये राहण्याची परवानगी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजय दत्तने सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद

अभिनेता संजय दत्तला संयुक्त अरब अमिरातीने घातलेल्या प्रवासी निर्बंधानुसार युएईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे. ही बातमी स्वतः संजय दत्तने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. यासोबत त्याने एक फोटोदेखील शेअर केला आहे. यात दुबईचे जनरल डायरेक्टर ऑफ रेसीडन्सी अँड फॉरेन अफेअर्सचे डायरेक्टर जनरल मेजर जनरल मोहम्मद अहमद अल मर्री हे संजय दत्तला गोल्डन व्हिसा सोपवताना दिसत आहेत. यासह संजयने युएई सरकारचे आभार देखील मानले आहेत.

सोशल मीडियावर व्यक्त केला आनंद
संजय दत्तने फोटो शेअर करत लिहिले, 'जीडीआरएफए दुबईचे डायरेक्टर मेजर जनरल मोहम्मद अहमद अल मर्री यांच्या उपस्थितीत युएईचा गोल्डन व्हिसा स्विकारताना आनंद होतोय. हा सन्मान दिल्याबद्दल युएई सरकारचे खूप खूप आभार…फ्याय दुबईचे सीओओ हमद ओबैदल्ला यांचे देखील आभार,' असे संजय म्हणाला आहे.

यासाठी महत्त्वपूर्ण आहे गोल्डन व्हिसा
2020 मध्ये यूएई सरकारने या व्हिसाची सुरुवात केली होती. युएईचा गोल्डन व्हिसा हा 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी मिळणारा व्हिसा आहे. भारतातल्या मेनस्ट्रीम कलाकारांपैकी अभिनेता संजय दत्त हा पहिला कलाकार आहे ज्याला युएईचा गोल्डन व्हिसा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...