आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजाराविषयी पहिल्यांदाच बोलला संजू:61 वर्षीय संजय दत्तने दाखवली कपाळावरची खूण, म्हणाला - 'मी याचा पराभव करणार आणि लवकरच कर्करोग मुक्त होणार'

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलूनमध्ये हेअर कटसाठी पोहोचला होता संजय, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये पुर्वीपेक्षा बरा दिसला.
  • 11 ऑगस्ट रोजी संजूला फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचे समोर आले होते, कोकिलाबेन रुग्णालयात सुरु आहेत उपचार

कर्करोगाशी झुंज देणारा अभिनेता संजय दत्तने प्रथमच आपल्या आजाराविषयी मन मोकळे केले आहे. सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अलीम हाकीम यांनी 61 वर्षीय संजूचे दोन व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये संजय दत्त सर्वांना अलीमची ओळख करुन देत आपल्या कपाळाची खुण दाखवत आहे. सोबतच तो म्हणतोय, "तुम्ही जर हे पाहिले तर ही माझ्या आयुष्यातील नवीन खूण आहे. परंतु मी त्याचा पराभव करेन आणि लवकरच कर्करोगातून मुक्त होईल."

संजूला पुन्हा कामावर परतल्याचा आनंद आहे व्हिडिओमध्ये संजय दत्त त्याच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलतोय. लॉकडाऊननंतर पुन्हा काम सुरु केल्याने आनंद झाल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, "घराबाहेर पडणे नेहमीच चांगले आहे. मी ही दाढी 'केजीएफ 2' साठी वाढवली आहे. आम्ही नोव्हेंबरमध्ये कामाला सुरुवात करत आहोत. मला पुन्हा सेटवर परतल्याचा आनंद आहे. . तसेच उद्या 'शमशेरा'ची डबिंग आहे. तिथेही मजा येईल," असे संजूने सांगितले.

पूर्वीपेक्षा तब्येतीत सुधारणा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात संजय दत्तचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यात तो खूप अशक्त दिसत होता. त्याची ढासळलेली तब्येत त्यात दिसली होती. आताच्या नवीन व्हिडिओत संजय दत्तच्या तब्येतीत सुधारणा झाल्याचे दिसत आहे.

11 ऑगस्ट रोजी कर्करोगाचा खुलासा झाला होता संजय दत्तला श्वासोच्छवासाच्या त्रासानंतर 8 ऑगस्ट रोजी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्याच्या काही चाचण्या घेण्यात आल्या. तीन दिवसांनंतर, 11 ऑगस्ट रोजी त्याला फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान झाले होते.

कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत वृत्तानुसार संजूला चौथ्या स्टेजचा कर्करोग झाला आहे आणि त्याच्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्याने किंवा त्याच्या कुटुंबियांनी याची पुष्टि केलेली नाही. संजूच्या आजाराची बातमी माध्यमांमध्ये आल्यानंतर त्याची पत्नी मान्यताने एक अधिकृत निवेदन जारी करुन लोकांना अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले होते.

मान्यताने पोस्टमध्ये लिहिले होते- संजूच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणा-या सर्वांचे मी आभार मानते. या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला तुमच्या प्रार्थनांची आवश्यकता आहे. या कुटुंबाने यापूर्वी खूप सहन केले आहे, परंतु मला खात्री आहे की ही वेळ देखील निघून जाईल. माझी सर्वांना विनंती आहे की, संजूच्या चाहत्यांनी कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये.

बातम्या आणखी आहेत...