आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेलर रिलीज:संजय दत्त स्टारर 'सडक 2'चा ट्रेलर रिलीज, विश्व हिंदू परिषदेने महेश भट्ट यांच्यावर केला हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • येत्या 28 ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

अभिनेता संजय दत्तच्या हेल्थ रिपोर्टने सर्व चाहत्यांना निराश केले आहे. संजयला फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. याचदरम्यान त्याच्या आगामी सडक 2 या चित्रपटाचा ट्रेलरही समोर आला आहे. महेश भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलरला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे. तर दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेने चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्यावर हिंदूविरोधी चित्रपट बनवल्याचा आरोप केला आहे.

  • चित्रपटाची कथा काय असेल?

'सडक 2' हा 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सडक'चा सिक्वेल आहे. यात संजय दत्त एका ट्रॅव्हल एजंटच्या भूमिकेत आहे. संजय दत्तच्या आयुष्यातील सर्वांत प्रिय व्यक्तीचा (पूजा भट्ट) मृत्यू होतो आणि त्यानंतर त्याचा जगण्यातला रस निघून जातो. अशातच त्याच्या आयुष्यात आर्या (आलिया भट्ट) एक नवीन उमेद घेऊन येते. संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर मिळून कैलाश पर्वतावर जाण्यासाठी तयार होतात आणि या प्रवासात काय घडतं याची कथा चित्रपटात पाहायला मिळेल. प्रवासादरम्यान, आलिया आणि आदित्य यांची रोमँटिक लव्ह स्टोरी आणि संजय दत्तचा इमोशनल अँगल दाखवला गेला आहे.

  • विश्व हिंदू परिषदेने महेश भट्ट यांच्यावर केले आरोप

या चित्रपटात हिंदूंच्या भावना दुखावणारी काही दृश्ये दाखविली असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. याविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. असे म्हटले जात आहे की, परिषदेने महेश भट्टवर यांच्यावर अँटी हिंदू चित्रपट बनवल्याचा आरोप केला आहे.

  • 'सडक 2' वर नेपोटिस्टिक असल्याचा आरोप

विश्व हिंदू परिषदेच्या प्रवक्त्याने केंद्र सरकारला या चित्रपटाविरोधात कारवाई करण्याची विनंती केली आहे. चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध झाल्यानंतरही प्रवक्ते विजयशंकर तिवारी यांनी लिहिले होते की, “महेश भट्ट दिग्दर्शित फिल्म सडक पुन्हा एकदा हिंदूंच्या भावनांचा अपमान करत आहे. हा चित्रपट हॉटस्टारवर दाखविला जाईल, चित्रपट केवळ नेपोटिज्मचा भडीमार आहे. ते महेश भट्ट पुढे नेत आहेत. केंद्र सरकारने यावर कारवाई केली पाहिजे."

हा चित्रपट यापूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता परंतु लॉकडाउन व चित्रपटगृह बंद असल्याने आता तो डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल. सडक 2 व्यतिरिक्त 5 मोठे चित्रपटही या कराराचा एक भाग आहेत. येत्या 28 ऑगस्ट रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...