आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होऊन आता महिना उलटला आहे. सध्या मुंबईत त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान संजयची पत्नी मान्यताने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. मान्यताने स्वतःचा एक जुना फोटो शेअर करुन लिहिले, "कधीकधी शांत राहणे चांगले. कारण आपल्या मनात आणि हृदयात काय सुरु आहे हे कोणतेही शब्द सांगू शकत नाहीत." फोटोत मान्यता उदास दिसत आहे.
View this post on InstagramA post shared by Maanayata Dutt (@maanayata) on Sep 2, 2020 at 8:50pm PDT
अनेक सोशल मीडिया यूजर्सनी मान्यताच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी तिला धैर्याने राहण्याचा सल्ला दिला आहे, तर काही संजू बाबांच्या तब्येतीबद्दल तिला विचारणा करत आहेत. एका नेटक-याने लिहिले, "हाय मॅम. संजय सर कसे आहेत? कृपया आम्हाला सांगा." आणि एकाने लिहिले आहे, "नेहमीप्रमाणे स्ट्राँग राहा." एका नेटक-याने लिहिले, "देवावर विश्वास ठेवा. सर्व काही ठीक होईल."
अलीकडेच एका रिपोर्टमध्ये लिहिले आहे, जेव्हा संजय दत्तला त्याला चौथ्या स्टेजचा कर्करोग झाल्याचे कळले तेव्हा तो पूर्णपणे हादरला होता. मात्र नंतर त्याने ते मान्य केले आणि या आजारावर मात कशी करावी याचा विचार करण्यास सुरूवात केली. त्याला आपल्या दहा वर्षांच्या जुळ्या (शाहरान आणि इकारा) मुलांची काळजी वाटतेय.
संजय दत्त प्राथमिक उपचारासाठी मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात गेला होता. मात्र आता त्याला पाच वर्षांचा यूएसचा व्हिसा मिळाला असून तो पुढचा उपचार अमेरिकेत करणार आहे. लवकरच तो जाण्याची तयारी करणार आहे. काही दिवसांपूर्वी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यात कोरोनाचीही तपासणीही करण्यात आली होती मात्र ती निगेटिव्ह आली.
काही दिवसांपूर्वी संजयची पत्नी मान्यताने एक निवेदन दिले हाेते. ती म्हणाली, या कठीण काळात आम्ही सामान्य जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला ही लढाई जिंकायची आहे. तिने संजयची बहीण प्रियाचे कौतुक केले होते. ती म्हणाली होती, या कठीण काळात प्रिया आमच्यासोबत उभी आहे. आईच्या वेळेसही प्रियाच ठामपणे उभी होती, त्यांनी तो त्रास सहन केला आहे. त्यांच्यामुळेच संपूर्ण कुटुंबाला शक्ती मिळते.
संजय दत्तला 8 ऑगस्ट रोजी रग्णालयात दाखल करण्यात आले होते. गळ्यात पाणी जमा झाल्याने त्याला श्वसनाचा त्रास होत होता. संजय दत्तच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी प्रचंड कमी झाली होती. त्याच्या फुफ्फुसांत पाणी जमा झाले होते आणि याचमुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. यानंतर त्याची कर्करोगाची चाचणी केली असता त्याला कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.