आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजू बाबाची कमिटमेंट:संजय दत्त उपचारांसाठी परदेशी रवाना होण्यापूर्वी 'सडक -2 'चे डबिंग करणार पूर्ण, चौथ्या स्टेजच्या फुफ्फुसाच्या कर्करोगाचे झाले आहे निदान

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजयचे थोडे काम बाकी आहे आणि त्याला ते पूर्ण करण्याची इच्छा आहे,

अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. उपचारांसाठी त्याला लवकरच परदेशी रवाना व्हायचे आहे. पण त्यापूर्वी संजय दत्त आपले कमिटमेंट पाळणार आहे. उपचारांसाठी संजय अमेरिकेला जाणार असल्याचे समजते. पण त्यापूर्वी तो त्याच्या आगामी 'सडक 2' या चित्रपटाचे डबिंग पूर्ण करणार आहे. ब्रेक घेण्यापूर्वी संजय दत्त चित्रपटाच्या डबिंगचे काम पूर्ण करणार आहे. त्याचे थोडे काम बाकी आहे आणि त्याला ते पूर्ण करण्याची इच्छा आहे, असे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

  • कुटुंबाने अधिकृतपणे आजारपणाची घोषणा केली नाही

8 ऑगस्ट रोजी संजयला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची कोरोना चाचणी देखील करण्यात आली. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर संजयला चौथ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचे कळाले. घरी परतल्यानंतर संजय दत्तने आपल्या हितचिंतकांना आरोग्याबद्दल अंदाज बांधू नका असे सांगितले होते. सोबतच संजय दत्त किंवा त्यांच्या कुटुंबियांनी अद्याप त्याच्या आजाराबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नाही.

  • पत्नी मान्यता दत्त म्हणाली - प्रार्थनेची गरज आहे, हा काळही निघून जाईल

बुधवारी संजयची पत्नी मान्यता दत्तने आपली प्रतिक्रिया दिली होती. “मी सर्व हितचिंतकांप्रती आभार व्यक्त करते, ज्यांनी संजयच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. या कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी आम्हाला प्रचंड शक्ती आणि आशीर्वादाची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून आमचे कुटुंब अनेक संकटांमधून गेले. मला विश्वास आहे की, ही वेळ, हा प्रसंगही निघून जाईल. संजूच्या सर्व चाहत्यांना माझी विनंती आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आम्हाला फक्त तुमचं प्रेम आणि पाठिंब्याची गरज आहे. संजू नेहमी लढवय्या राहिला आणि आमचं कुटुंबही. परमेश्वर पुन्हा आमची परीक्षा घेतोय. परमेश्वराला बघायचंय की, आम्ही कसं या संकटाचा सामना करतो. आम्हाला फक्त तुमची प्रार्थना आणि आशीर्वादाची गरज आहे. आम्हाला माहिती आहे, आम्ही जिंकू, जसं आम्ही नेहमीप्रमाणे जिंकत आलो आहोत, अगदी तसंच जिंकू. चला, या संधीला प्रकाशमान करु आणि सकारात्मकता पसरवण्यासाठी वापर करु”, असे मान्यता म्हणाली.

  • रिपोर्ट्सचा दावा - संजूला चौथ्या स्टेजचा कर्करोग

काही दिवसांपूर्वी संजयने कामातून ब्रेक घेत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. त्यानंतर त्याला तिसऱ्या स्टेजचा कर्करोग झाल्याचे म्हटले जात होते. परंतु, आता त्याला चौथ्या टप्प्यातील कर्करोग झाल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

  • संजय दत्त भुज आणि केजीएफ -2 मध्ये देखील दिसणार आहे

संजय दत्तच्या निकटवर्तीयाने वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, त्याच्या चित्रपटाचे काम थोडेच बाकी आहे आणि संजय दत्त ते पूर्ण करणार आहेत. 'सडक -2' आणि 'भुज' हे संजय दत्तचे आगामी चित्रपट आहेत. हे डिस्ने प्लस हॉट स्टारवर रिलीज होईल. 'केजीएफ -2' मध्ये संजय दत्त मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय तो रणबीर कपूरसह 'शमशेरा'मध्येही काम करत आहेत. 2019 मध्ये संजय दत्त आशुतोष गोवारीकरांच्या 'पानिपत', करण जोहरच्या 'कलंक' आणि 'प्रस्थानम'मध्ये दिसला होता.

बातम्या आणखी आहेत...