आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शमशेरा:संजय दत्तचे पात्र दरोगा शुद्ध सिंहचा लूक रिव्हिल, म्हणाला- खलनायक बनून खूप मजा आली

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खलनायकाची भूमिका एक्साइटिंग आहे - संजय

'शमशेरा'च्या निर्मात्यांनी अभिनेता रणबीर कपूरचा लूक आणि चित्रपटाच्या टीझरनंतर गुरुवारी संजय दत्तचा अधिकृत कॅरेक्टर लूक रिव्हिल केला आहे. या चित्रपटात संजय खलनायक साकारतोय. चित्रपटातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना त्याने एका मुलाखतीत सांगितले की, खलनायकाची भूमिका साकारणे खूप रोमांचक होते. या चित्रपटातील संजयच्या पात्राचे नाव दरोगा शुद्ध सिंह असे आहे.

खलनायकाची भूमिका एक्साइटिंग आहे - संजय
संजय दत्त म्हणाला, "खलनायकाची भूमिका साकारणे नेहमीच रोमांचक असते, कारण तुम्ही नियम तोडता. तुम्ही खलनायकाची व्यक्तिरेखा तुमच्या पद्धतीने साकारू शकता. मला ही भूमिका करताना खूप आनंद झाला आणि मी भाग्यवान समजतो की लोकांना मी आतापर्यंत साकारलेल्या नकारात्मक भूमिका आवडल्या."

संजय दत्तने भूमिकेबद्दल सांगितले
'शमशेरा'मधील आपल्या भूमिकेबद्दल संजय पुढे म्हणाला, "तो एक अतिशय वाईट आणि धोकादायक व्यक्ती आहे, ज्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. तो इतरांना नष्ट करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. करण मल्होत्राने निर्माण केलेला खलनायक मला खूप आवडला. आणि त्याने या पात्रासाठी मला निवडले. त्याने मला शुद्ध सिंहची भूमिका साकारण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिले होते आणि मला आशा आहे की लोकांना ते आवडेल."

22 जुलैला रिलीज होणार आहे हा चित्रपट
संजय दत्त 'अग्निपथ'नंतर करण मल्होत्रासोबत 'शमशेरा'मध्ये दुसऱ्यांदा काम करत आहे. चित्रपटाची कथा एका गुलाम माणसाची आहे. आपल्या टोळीसाठी गुलामापासून नेता आणि नंतर लिजेंड बनण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे. हिंदी, तामिळ आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये हा चित्रपट 22 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.