आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुनील दत्त यांना या जगाचा निरोप घेऊन 15 वर्षे झाली आहेत. त्यांचा मुलगा संजय दत्त वडिलांचे स्मरण करून अजूनही भावूक होतो. 25 मे रोजी सुनील दत्त यांची 15 वी पुण्यतिथी आहे. संजयने आपल्या वडिलांची आठवण करीत एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये संजय वडिलांसोबत बर्याच छायाचित्रांमध्ये दिसला आहे.
View this post on InstagramA post shared by Sanjay Dutt (@duttsanjay) on May 24, 2020 at 11:34pm PDT
संजयने हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. संजयने वडिलांसोबतची आपल्या बालपणापासून ते रुपेरी पडद्यापर्यंतची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. त्याने लिहिले- तुम्ही माझ्याबरोबर होता तोपर्यंत मला माहित होते की मला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही. मला नेहमी पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. मिस यू डॅड.
सुनील दत्त यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. निधनाच्या 12 दिवसांनी म्हणजे 6 जून रोजी त्यांचा 76 वा वाढदिवस होता. सुनील दत्त यांचा संजयवर खूप जीव होता. संजय दत्तच्या जीवनवर आधारित 'संजू' या चित्रपटातही ही गोष्ट दर्शविली गेली आहे. 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजकुमार हिरानी यांच्या 'संजू' या चित्रपटात परेश रावल यांनी सुनील दत्त यांची भूमिका साकारली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.