आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हीरामंडी:रेखा आणि माधुरी 'हीरामंडी'मध्ये कास्ट होणार असल्याच्या अफवांवर संतापलेले संजय लीला भन्साळी, म्हणाले - पोर्टल स्वतःच कास्टिंग करत आहे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता संजय लीला भन्साळींनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी लवकरच 'हीरामंडी' हा चित्रपट घेऊन येत आहे. चित्रपटाच्या घोषणेपासून यात रेखा आणि माधुरी दीक्षित महत्त्वाच्या भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 2001 मध्ये आलेल्या 'लज्जा' या चित्रपटात या दोघींनी काम केले होते. तर दुसरीकडे रेखाऐवजी आता ऐश्वर्या राय बच्चन हिला या चित्रपटामध्ये कास्ट करण्यात आल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. एकापाठोपाठ एक अशा बातम्या येत असल्याने आता संजय लीला भन्साळींनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

अलीकडेच, संजय लीला भन्साळी यांनी रेखा, माधुरी आणि ऐश्वर्याच्या कास्टिंगच्या बातम्यांवर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "आम्ही अशा कास्टिंग रिपोर्टसचे खंडन करत नाहीये म्हणून आता पोर्टल स्वतःच कास्टिंग करत आहेत. दररोज मी सकाळी उठतो आणि हीरामंडीमध्ये कोण झळकणार आहे, याबद्दलची चर्चा ऐकतोय.'

रेखा आणि माधुरी 'लज्जा' चित्रपटात झळकल्या होत्या, पण दोघींचे सोबत एकही सीन नव्हता. या चित्रपटात वेगवेगळ्या स्त्रियांची कथा दाखवण्यात आली, ज्यात रेखा आणि माधुरी यांनी दोन वेगवेगळ्या भागांमध्ये काम केले होते. बातम्यांनुसार, निर्मात्यांनी अद्याप हीरामंडीसाठी रेखा किंवा माधुरी यांच्यापैकी कुणाशीही संपर्क साधलेला नाही.

हीरामंडी पूर्वी संजय आलिया भट्ट स्टारर 'गंगूबाई काठियावाडी' घेऊन येत आहे. याशिवाय, भन्साळी 'बैजूबावरा' या चित्रपटावरही काम करत आहेत ज्यात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पदुकोणचे नावही या चित्रपटासाठी समोर आले होते. पण दीपिकाने रणवीर एवढे मानधन मागितल्याने ती या चित्रपटातून बाहेर पडली आहे.

बातम्या आणखी आहेत...