आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात सेलिब्रिटी:रणबीर कपूर पाठोपाठ दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना कोरोनाची लागण, घरीच केले स्वतःला क्वारंटाइन; 'गंगूबाई काठियावाडी'चे चित्रीकरण थांबवले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेता रणबीर कपूरला कोरोनाची लागण झाली आहे. रणबीरची आई नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या वृत्ताला दुजोरा दिला. आता बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. भन्साळी सध्या मुंबईत त्यांच्या आगामी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'संजय लीला भन्साळी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. संजय लीला भन्साळी आणि रणबीर दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आलिया आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोनाची चाचणी केली आहे.”

भन्साळी यांच्या मातोश्री लीला भन्साळी यांचीही चाचणी करण्यात आली. मात्र त्या कोरोना निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. तरी देखील त्यांनी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. भन्साळींना कोरोनाची लागण झाल्याने गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता अजय देवगणने त्यांच्यासह चित्रीकरणाला सुरुवात केली होती.

बातम्या आणखी आहेत...