आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गंगूबाई काठियावाडी’ वादात:आलिया भट्टचा चित्रपट वादाच्या भोव-यात, गंगूबाईच्या कुटुंबीयांची आलिया आणि संजय लीला भन्साळीविरोधात तक्रार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांनी खूप मेहनत घेतली आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला आहे. हा चित्रपट हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र आता गंगूबाईच्या कुटुंबियांनी 22 डिसेंबर रोजी संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन कैदी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. गंगूबाई काठियावाडी यांच्या कुटुंबियांना चित्रपटाबद्दल काही आक्षेप आहेत. संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि हुसेन जैदी यांना त्यांचे मत मांडण्यासाठी 7 जानेवारी 2021 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

हुसैन जैदी यांच्या पुस्तकावर आधारित आहे चित्रपट
सध्या या चित्रपटाचे मुंबईतील फिल्मसिटी येथे चित्रीकरण सुरु आहे. शूटिंगच्या सेट डिझायनिंगवर तब्बल साडे सहा कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. हुसेन जैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकावर आधारित या चित्रपटात डॉन गंगूबाईची कहाणी दाखवण्यात येणार आहे. असे सांगितले गेले आहे की, गंगुबाई हे 60 च्या दशकात मुंबई माफियाचे एक मोठे नाव होते. गंगुबाई यांना त्यांच्या पतीने केवळ 500 रुपयांत विकले होते. त्यानंतर त्या वेश्या व्यवसायात गुंतल्या. यावेळी त्यांनी अनेक मुलींच्या उन्नतीसाठी काम केले.

चित्रपटात अजय देवगणचा कॅमिओ
या चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी यांनी खूप मेहनत घेतली आहे. चित्रपटाच्या सेटवर त्यांनी बरीच कामे केली आहेत. अनेक आर्किटेक्ट बोलल्यानंतर सेटला अंतिम रूप देण्यात आले आहे. गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलिया व्यतिरिक्त अजय देवगण पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. चित्रपटात तो आलियाच्या गुरूची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट फाळणीच्या आधी आणि नंतरची कथा देखील दाखवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...