आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वध'चा ट्रेलर प्रदर्शित:संजय मिश्रा आणि नीना गुप्तांच्या 'वध'मध्ये सस्पेन्सचा तडका

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता स्टारर 'वध' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनी संजय मिश्रा यांना त्यांच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारताना पाहिलं आहे, पण आता 'वध'या चित्रपटातून ते एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर इतका अनअपेक्षित आहे की त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढते. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या व्यक्तिरेखेत खूपशी निरागसता दिसत असली तरीसुद्धा त्यांची डार्कसाइड ट्रेलरचा एक महत्वपूर्ण भाग आहे. ट्रेलरमध्ये सस्पेन्सचा तडका आहे.

पाहा ट्रेलर...

'वध'बद्दल बोलताना संजय मिश्रा म्हणाले, "एक अभिनेता म्हणून मी अशा पात्राची कल्पनाही केली नव्हती, तीही नीनाजींसोबत. प्रेक्षक या चित्रपटाला कसा प्रतिसाद देतात हे पाहण्यासाठी मी उत्सुक आहे."

नीना गुप्ता म्हणाल्या, "'वध'ही एक अतिशय मनोरंजक थ्रिलर कथा आहे आणि या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मी चांगला वेळ घालवला. कथा जशी दिसते त्यापेक्षा कितीतरी पटीने आकर्षक आहे. आणि प्रेक्षक ट्रेलर तसेच चित्रपट पाहण्याचा आनंद घेतील."

'वध'हा चित्रपट राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधू लिखित आणि दिग्दर्शित असून, जे स्टुडिओ आणि नेक्स्ट लेव्हल प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. तसेच, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. हा चित्रपट 9 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...