आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग:पंतप्रधान मोदी यांच्या स्वावलंबी व्हा या मंत्रावर बनला आहे संजय मिश्रा आणि विजय राज स्टारर 'वाह जिंदगी' हा चित्रपट

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट निर्मात्यांनी ओटीटी प्लेटफार्मवर प्रदर्शित करण्याचीही तयारी ठेवली आहे.

कोविड-19च्या थैमानाने संपुर्ण विश्व हादरलं आहे. पुरतं विश्व जिथं कोरोना वायरस सोबत लढत आहे, तिथं दुसरीकडे या महामाारीने जगाच्या अर्थव्यवस्थेलाही उद्धवस्त केलं आहे. अशात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संकटाला तोंड देण्यासाठी स्वावलंबी व्हा आणि स्वदेशी सामान खरेदी करा असा नारा दिला आहे. यातच योगायोगानं अशोेक चौधरी याच विषयावर आधारीत एक सिनेमा घेऊन येत आहेत.

'वाह जिंदगी' नावाच्या या चित्रपटात स्वदेशीला अंगिकारणे आणि मेक इन इंडिया बाबत संदेश देण्यात आला आहे. हा चित्रपट हुबेहूब तेच बोलतोय जे मोदीजींनी सांगितले आहे. चित्रपट अशा एका माणसावर आधारीत आहे, जो त्याच्या भूतकाळाला कंटाळून स्वःतला शोधण्याचा मार्गावर निघतो. या दरम्यान तो आपल्या देशातच वस्तू बनवण्याच्या मार्गावर चालायला लागतो. मात्र त्याला त्याच्या या मार्गात चिनी सामानरूपी गोष्टींचे अनेक अडथळे लागतात.

'वाह जिंदगी' चे दिग्दर्शन  एफटीआईआईचे विद्यार्थी राहिलेले दिनेश एस. यादव यांनी केले आहे. या चित्रपटात संजय मिश्रा, विजय राज, नवीन कस्तुरीया, प्लाबिता  बोरथाकरसारखे दिग्गज कलाकार महत्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.  'वाह जिंदगी'च्या आधीसुद्धा निर्माता अशोक चौधरी आणि दिग्दर्शक दिनेश एस. यादव यांनी 'टर्टल' नावाच्या चित्रपटात सोबत काम केलं आहे.  राजस्थानच्या पाणी  संकटावर बनलेल्या या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारानेसुद्धा सन्मानित करण्याात आलं आहे. 

अशोक चौधरींच्या चित्रपटाला आजच्या काळातील एक अत्यंत वास्तववादी चित्रपट म्हणण्यात आलं आहे. ते म्हणता - या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही मनोरंजक भावनेतून  एक अर्थपूर्ण कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एक अशी कहाणी जी आजच्या जगात स्वदेशीचं महत्व पटवून देते.

अशोक चौधरी सांगतात, " आम्हाला याचा अभिमान आहे की लोकांना स्वदेशी आता फक्त बोलण्याचा शब्द वाटत नाही तर जीवनाचा एक भाग असल्याचा आता वाटतंय.  मला आशा आहे, पंतप्रधानांच्या या भाषणानंतर लोक त्यांचे शब्द आपल्या जीवनात अंमलात आणतील. आमच्या चित्रपटातूनही आम्ही हाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 

ओटीटी वर प्रदर्शित होऊ शकतो हा चित्रपट

हा चित्रपट निमार्त्यांना चित्रपटगृहात प्रदर्शित करायचा आहे, मात्र सध्याच्या अडचणी पाहता हा चित्रपट त्यांनी ओटीटी प्लेटफार्मवर प्रदर्शित करण्याचीही तयारी ठेवली आहे. 

बातम्या आणखी आहेत...