आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणातील राजकारण:संजय राऊत म्हणाले- सीबीआय केंद्राची एजन्सी, गुन्हा दाखल करणे ही त्यांची मजबुरी; सुशांतच्या वडिलांच्या दुस-या लग्नाच्या आरोपांवर निरुपम म्हणाले - शिवसेनेने संवेदनशीलता दाखवावी

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • सुशांतचे कुटुंबीय राऊत यांच्या आरोपांमुळे संतापले आहेत. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणात आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. त्यांनी मुंबई पोलिसांची स्तुती करत सुशांतचे वडील के.के. सिंह यांच्या दुसऱ्या लग्नावर प्रश्न उपस्थित केले होते. सोबतच एफआयआर दाखल करुन घेणे ही सीबीआयची मजबुरी आहे. सीबीआय ही केंद्र सरकारची एजन्सी आहे. या प्रकरणात बिहार सरकारचा काहीही संबंध नाही, असे राऊत म्हणाले. तर दुसरीकडे सुशांतचे कुटुंबीय राऊत यांच्या आरोपांमुळे संतापले आहेत. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे.

 • संजय राऊत यांनी कुटुंबावर वैयक्तिक आरोप केले होते, अंकिता लोखंडे हिलाही लक्ष्य केले

शिवसेना नेते संजय राऊत यांनी सुशांतच्या कुटुंबीयांवर पक्षाचे मुखपत्र सामना मधील अग्रलेखात अनेक गंभीर आरोप केले आहेत. वडिलांनी दुसरे लग्न केल्याने त्याचे वडिलांशी संबंध चांगले नव्हते, असे त्यांनी म्हटले. याशिवाय संजय राऊत यांनी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिलाही लक्ष्य केले. अंकिता लोखंडे आणि रिया चक्रवर्ती या दोन अभिनेत्री तरुणी त्याच्या आयुष्यात होत्या. यापैकी अंकिताने सुशांतला सोडले आणि रिया त्याच्या सोबत होती. आता अंकिता रियाविषयी वेगळे बोलत आहे. मुळात अंकिता आणि सुशांत हे वेगळे का झाले, त्यावर प्रकाश पाडायला कोणी तयार नाही. तपासाचा तो एक भाग असायला हवा, असेही राऊत यांनी म्हटले आहे.

 • कुटुंब म्हणाले - मानहानीचा दावा करु

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार सुशांतचे चुलत भाऊ भाजपा नेता नीरज सिंह बबलू यांनी संजय राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकण्याचा इशारा दिला आहे. “सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत. असे खोटे आरोप करणे चुकीचं आहे. अफवा पसरवून संजय राऊत या प्रकरणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. कुटुंबावर केलेल्या या आरोपासाठी आम्ही त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहोत.” असा इशारा नीरज सिंह यांनी दिला.

 • शिवसेनेने संवेदनशीलता दाखवावी: संजय निरुपम

शिवसेनेच्या खासदार संजय राऊत यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले, "शिवसेनेचे खासदार संजय राऊत सुशांतच्या कुटुंबाबद्दल बोलत आहेत. प्रत्येक कुटुंबात काही ना काही कहानी असते. शिवसेनेच्याही ब-याच आहेत. पण सुशांतचा मृत्यू हा संवेदनशील विषय आहे. शिवसेनेने यावर संवेदनशीलता दाखवली पाहिजे", असे ट्विट निरुपम यांनी केले.

 • काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊत यांनी सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यावरून सामनाच्या ‘रोखठोक’ सदरातून अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

 • मुंबई पोलिस ही जगातील सर्वोच्च तपास यंत्रणा आहे. मुंबई पोलिस दबावाला बळी पडत नाहीत. ते पूर्णपणे प्रोफेशनल आहेत. शीना बोरा हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला. त्यात अनेक बडी नावे गुंतली होती, पण पोलिसांनी सगळ्यांना तुरुंगात पाठवले. मुंबई पोलिसांनीच 26/11 चा दहशतवादी हल्ला परतवून लावला व भक्कम पुरावे उभे करून कसाबला फासावर लटकवले. त्यामुळे सुशांतसारख्या प्रकरणात केंद्राने हस्तक्षेप करणे हा मुंबई पोलिसांचा अपमान आहे.
 • सुशांतचे त्याच्या वडिलांशी संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते.
 • सुशांतच्या वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक एफआयआर दाखल करायला लावला गेला आणि मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलिस मुंबईला आले, याचे समर्थन होऊच शकत नाही, असे राऊत म्हणाले.
 • सुशांत हा गेल्या काही वर्षांत संपूर्ण मुंबईत बनला. त्याचा बिहारशी संबंध नव्हता. सुशांतला सर्व वैभव मुंबईनेच दिले. त्याच्या संघर्षाच्या काळात बिहार त्याच्या पाठिशी नव्हता.
 • बिहारचे पोलिस म्हणजे इंटरपोल नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिस करीत आहेत. त्याच वेळी दुस-या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरु करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे. बिहार पोलिसांकडे याबाबत काही वेगळी मते असतील तर त्यांनी मुंबई पोलिसांशी यावर चर्चा करायला हरकत नाही. सत्य समजून घेणे हा सगळ्यांचा अधिकार आहे. पण हे सत्य फक्त बिहारेच पोलिस किंवा सीबीआय शोधू शकेल, ही भूमिका चुकीची आहे.
 • बिहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी वृत्तवाहिन्यांवर खाकी वर्दीत जाऊन बोलतात. वृत्तवाहिनीवरील चर्चेत ते सहभागी होतात. हा सरळसरळ पोलिसी शिस्तभंग आहे. गुप्तेश्वर पांडे हे बीजेपीचे आहे आणि त्यांच्यावर 2009 मध्ये अनेक चार्च लागले होते. भाजपकडून उमेदवारी स्वीकारलेले पांडे यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणे हास्यास्पद आहे.
 • सीबीआय’ ही केंद्रीय तपास यंत्रणा असली तरी ती स्वतंत्र आणि निःपक्ष नाही हे अनेकदा दिसून आले. अनेक राज्यांनी सीबीआयवर बंदीच घातली आहे, असे राऊत यांनी म्हटले.

सुशांत आणि दिशाचे प्रकरण आपापसांत जोडल्याने नाराज झाले संजय राऊत

'सामना'च्या लेखात सुशांत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सॅलिआन यांचे प्रकरण आपापसांत जोडल्याने संजय राऊत यांनी टीका केली. "ही दोन्ही प्रकरणे संपूर्ण वेगळी आहेत. पण राजकीय पुढारी दोन आत्महत्यांचा धागा जुळवत आहेत. दिशा हिच्यावर बलात्कार करुन तिला इमारतीवरुन फेकले, असा आरोप भाजपचे एक पुढारी करतात, तेव्हा त्यांनी तिच्या कुटुंबाचा थोडाही विचार केलेला दिसत नाही", असे राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...