आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडद्यामागील खास गोष्टी:संजीव कुमार यांनी सायरा यांना लिहिले होते प्रेमपत्र, पिच्छा सोडवण्यासाठी जया बच्चन यांनी सेटवरच बांधली होती त्यांना राखी 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 वेळा उत्कृष्ट अभिनेता म्हणून संजीव कुमार यांना फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
  • 1971 मध्ये ‘दस्तक’ चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्याचा ‘नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला.
  • 1973 मध्ये ‘कोशिश’ चित्रपटासाठीदेखील उत्कृष्ट अभिनेत्याचा नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला.
  • 1974 मध्ये पुन्हा ‘कोशिश’साठी ‘बीएफजेए बेस्ट अ‍ॅक्टर’चा पुरस्कार मिळाला. 2013 मध्ये संजीव यांच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीट काढण्यात आले.
  • 108 कोटी रुपये खर्चून सुरतमध्ये बनवलेले संजीव कुमार यांच्या नावाने ऑडिटोरियमदेखील आहे. त्याचे उद‌्घाटन पंतप्रधान मोदी यांनी ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना केले.

हिंदी चित्रपटसृष्टीचा एक अभिनेता ज्याची कामगिरी अतुलनीय होती, पडद्यावरील त्याची छोटीशी भूमिकाही दमदार असायची. सुपरस्टार दिलीपकुमारही त्याचे कौतुक करायचे. तो कुणासारखा नव्हता आणि कोणीही त्याच्यासारखा होऊ शकला नाही. तो मनाने प्रेमळ, मित्रांचा मित्र होता. ज्याला प्रेमाने बॉलिवूड म्हणायचे... केम छो हरी भाई...

संजीव कुमार यांना बॉलिवूड हरी भाई म्हणायचे. त्यांचे खरे नाव हरिहर जेठालाल जरीवाला होते. जरी आज संजीव कुमार जगात नाहीत तरीदेखील त्यांच्या अभिनयाची छाप आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात तशीच आहे. संजीव यांना अभिनयाचा छंद जडला तर ते इप्टाशी जोडले गेले आणि रंगमंचावर काम करू लागले. तेव्हा त्यांनी भारतीय राष्ट्रीय रंगमंचाच्या माध्यमातून बऱ्याच नाटकात कामे केलीत. संजीव कुमार यांचा ‘हम हिंदुस्तानी’हा पहिला चित्रपट होता. यानंतर त्यांनी बऱ्याच चित्रपटातून छोट्या-मोठ्या भूमिका केल्या आणि हळूहळू आपली ओळख निर्माण केली. यानंतर 1968 मध्ये प्रदर्शित झालेला ‘राजा और रंक’चित्रपटाच्या यशानंतर संजीव इंडस्ट्रीमध्ये खऱ्या अर्थाने उभे राहिले. ‘संघर्ष’मध्ये त्यांनी दिलीपकुमार यांच्यासोबत छोटीशी भूमिका साकारली होती. त्या छोट्याशा भूमिकेतूनही त्यांनी आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप सोडली. दिलीप साहेबदेखील तेव्हा त्यांच्या अभिनयाने खूप प्रभावित झाले होते.

  • शत्रुघ्न सिन्हा यांना दिले 10 लाख रुपये

संजीव कुमार आणि शत्रुघ्न सिन्हा यांची घट्ट मैत्री होती. ‘खिलौना’ चित्रपटात संजीव यांच्या सांगण्यावरूनच शत्रुघ्न यांना खलनायकाची भूमिका मिळाली होती. एकदा शत्रुघ्न यांना पैशांची खूप गरज होती, तर ते सुभाष घई यांच्याकडे मदत मागण्यासाठी गेले, परंतु त्यांनी मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर शत्रुघ्न यांनी संजीवला मदत मागितली. संजीव यांनी त्वरित 10 लाख रुपये काढून त्यांना दिले आणि म्हणाले, शत्रुघ्न, ज्यावेळी तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा तू मला परत कर. मात्र, शत्रुघ्न त्यांना पैसे कधीच परत करू शकले नाहीत, कारण काही दिवसांनंतर संजीव कुमार यांचे निधन झाले.

  • पिच्छा सोडवण्यासाठी जया बच्चन यांनी सेटवरच संजीव यांना बांधली होती राखी

मुलींच्या बाबतीत संजीव कुमार कमनशिबी होते, असे म्हटले जाते. जया भादुरी यांच्यासाेबत बऱ्याच चित्रपटात काम करता करता त्यांना त्या आवडायला लागल्या. त्या काळात जया, अभिताभ यांच्या प्रेमात वेड्या होत्या. हे संजीव यांना माहीत होते, तरीदेखील त्यांनी जयाला प्रपोज केले. नंतर ‘नोकर’च्या चित्रीकरणादरम्यान संजीव त्यांना पहाताच गाणी गायला लागायचे. एक दिवस जया सेटवर राखी घेऊन आल्या आणि जसे संजीव त्यांना पाहून गाणे गाऊ लागले तर त्यांनी संजीव यांच्या मनगटावर राखी बांधली.

  • हेमा यांच्यासाठी वेडे होते संजीव आणि संजीवसाठी वेड्या होत्या सुलक्षणा

संजीव कुमार ज्याच्यावर प्रेम करायचे त्याला आपल्या हृदयात स्थान द्यायचे. अशाच त्यांंच्या मनात ड्रीम गर्ल हेमामालिनी बसल्या होत्या. ते हेमा यांच्यावर खूप प्रेम करायचे. त्यांनी हेमाला हे सांगितलेही होते आणि लग्नाचा प्रस्तावही ठेवला होता. यादरम्यानच त्यांच्या आयुष्यात धर्मेंद्र यांची एंट्री झाली आणि संजीव यांचे स्वप्न अपूर्ण राहिले. अभिनेत्री सुलक्षणा पंडित सोबत संजीव यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चादेखील खूप होती, परंतु संजीव, सुलक्षणासोबत लग्न करू शकले नाहीत. संजीव यांच्या मृत्यूनंतर सुलक्षणा डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. याचा परिणाम असा झाला की, सुलक्षणा पंडित यांनी लग्नच केले नाही.

  • सायरा यांना लिहिले होते प्रेमपत्र

सायरा बानो अाणि संजीव यांची पहिली भेट ‘जंगली’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. संजीव त्या काळात नवोदित अभिनेते होते आणि स्टुडिओमध्ये स्टंटमॅन म्हणून काम करायचे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सायरा, शम्मी कपूर यांच्या वर्तणुकीमुळे खूप त्रस्त असायच्या. संजीव यांची सायरा यांच्या आई आणि भावाशी चांगली मैत्री होती. त्रस्त सायरा यांना संजीव सेटवर असल्यामुळे हायसे वाटायचे. दोघांतही चांगली मैत्री झाली. संजीव या मैत्रीला प्रेम समजले आणि सायरासाठी त्यांच्या मनात वेगळ्या भावना येऊ लागल्या. संजीव यांनी सायराला प्रेमपत्र लिहिल्यावर त्यांना संजीवच्या भावना समजल्या. सायरा यांच्यासाठी हा धक्काच होता, परंतु त्यांच्या आईला हे समजले तर गोंधळ सुरू झाला. शेवटी त्यांना मनातून सायरा यांचे विचार काढावेच लागले.

  • नंदा यांनी संजीवला आपला नायक मानण्यास दिला नकार

करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये संजीव यांचा अभिनेत्री नंदा यांनी सेटवर खूप अपमान केला होता, परंतु या गोष्टींची नंदा यांना आयुष्यभर खंत होती. संजीव ‘पति पत्नी’ चित्रपटात नंदा यांच्या पतीची भूमिका साकारणार होते. एक दिवस ते काम संपल्यानंतर मेट्रो सिनेमामध्ये चित्रपट पाहायला गेले. योगायाेगाने नंदादेखील त्या दिवशी तेथे आल्या. नंदा या प्रसिद्ध अभिनेत्री असल्यामुळे त्या बालकनीत बसल्या आणि संजीव खाली फर्स्ट रो मध्ये बसले होते. संजीव यांनी नंदा यांना पाहिल्यावर हाय केले. हा नायक पाहा, काय याचा अवतार आणि फर्स्ट रो मध्ये जाऊन चित्रपट पाहतो. हा माझा नायक असूच शकत नाही, अशी तक्रार दुसऱ्या दिवशी नंदा यांनी दिग्दर्शकाकडे केली. यानंतर संजीव सेटवर पोहोचले तर संपूर्ण युनिट त्यांच्याकडे पाहून हसले. या गोष्टीचे संजीवला खूप वाईट वाटले, तरीदेखील त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले. चित्रपट लोकप्रिय झाला त्यावेळी नंदा आणि ते समोरासमोर आले त्यावेळी नंदा या खूप खजिल झाल्या.

  • करिअरमध्ये पात्रांसोबतच करायचे प्रयोग

संजीव कुमार यांनी आपल्या करिअमध्ये अनेक प्रयोग केले. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी केवळ नायक म्हणून काम न करता प्रौढ व्यक्तीच्या भूमिकाही साकारल्या. रंगमंचावर काम करत असताना संजीव कुमार यांनी वयाच्या 22 व्या वर्षीच 60 वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. याचेच एक उदाहरण द्यायचे झाले तर त्यांना ‘खिलौना’ चित्रपटात एका वेड्या युवकाची भूमिका करण्याची संधी मिळाली तर त्यांनी ते पात्रही साकारले आणि असे उत्कृष्ट साकारले की फिल्मफेअरमध्ये उत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले. त्याच वर्षी ‘दस्तक’ प्रदर्शित झाला, त्यासाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

  • दिलीप कुमार यांनी केले दाक्षिणात्य निर्मात्यांजवळ संजीव यांचे कौतुक

‘संघर्ष’ आणि ‘खिलौना’ नंतर संजीव यांना चांगले चित्रपट मिळू लागले होते. त्याच काळात दाक्षिणात्य निर्मात्यांना 60 च्या दशकातील ‘नवरात्री’ चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवायचा होता. यासाठी ते दिलीप कुमार साहेबांना भेटले. मूळ चित्रपटात शिवाजी गणेशन यांनी 9 वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या. निर्माते ए.पी.नागराजन यांना असे वाटत होते की, ही भूमिका फक्त दिलीप कुमारच करू शकतात. परंतु, ते दिलीप साहेबांकडे गेले तर ते म्हणाले, मी तर हा चित्रपट करू शकत नाही, परंतु तुम्ही संजीवला घेऊ शकता. तोच असे काही तरी वेगळे करू शकतो. नंतर ‘नया दिन नई रात’ हा चित्रपट आला. यात त्यांनी 9 भूमिका साकारल्या ज्या अविस्मणीय झाल्या. दिलीप साहेब त्यांचे कौतुक करताना म्हणाले की, हिंदी चित्रपटात एक असा कलाकार आहे ज्याच्यात नऊ रस सादर करण्याची क्षमता आहे.

  • मित्राच्या चित्रपटात काम करण्यास दिला नकार, चित्रपट झाला बंद

संजीव रंगमंचावर काम करत असतानाच्या काळात त्यांचे मित्र आणि अभिनेता अमृत पटेल यांच्या ‘तीन बंदर’ चित्रपटात काम करणार होते. परंतु, या चित्रपटाला संजीव यांच्या डेट्समुळे उशीर होत होता. संजीव चित्रपटासाठी महिन्यातून फक्त दोनदा चित्रीकरण करायचे. शेवटी अमृत यांनी त्यांना विचारले की, तू चित्रपट करणार आहेस की नाही? तर ते म्हणाले, तू दुसऱ्या कुणाला तरी चित्रपटात घे. यानंतर अमृत यांनी उत्तम कुमार यांना चित्रपटात घेतले. उत्तम यांनी तीन महिने चित्रीकरण केले, परंतु यादरम्यानच त्यांचे निधन झाले. त्यानंतर चित्रपट बंदच झाला.

  • संजीव यांच्या निधनानंतर प्रदर्शित झालेले चित्रपट

1993 मध्ये चित्रपट ‘प्रोफेसर की पडोसन’, ‘कातिल’ (1986), ‘हाथों की लकीरें’ (1986), ‘बात बन जाए’ (1986), ‘कांच की दीवार’ (1986), ‘लव्ह अॅण्ड गॉड’ (1986), ‘राही’(1986, ‘दो वक्त की रोटी’ (1988), ‘नामुमकिन’ (1988), ‘ऊंच नीच बीच’ (1989)

बातम्या आणखी आहेत...