आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चला हवा येऊ द्या':थुकरटवाडीमध्ये 'कॉमेडी फॅक्टरी'च्या कलाकारांची धमाल, डॉ. संकेत भोसलेने केली कैलाश खेर आणि सयाजी शिंदे यांची मिमिक्री

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॉमेडी फॅक्टरीची थुकरटवाडीमध्ये एंट्री.

आपला रोजचा ताणतणाव विसरून आपल्याला हसायला लावणारा, अनेक सेलिब्रिटींच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे 'चला हवा येऊ द्या.' या लोकप्रिय कार्यक्रमात झी टीव्ही वाहिनीवरील झी कॉमेडी फॅक्टरी या आगामी कार्यक्रमाच्या निमित्ताने फराह खान, अली अजगर, डॉक्टर संकेत भोसले, सुगंध मिश्रा, पुनीत पाठक आणि तेजस्वी प्रकाश या कलाकारांनी उपस्थिती लावली. सर्व कलाकारांनी या मंचावर अक्षरशः धुमाकूळ घातला.

डॉक्टर संकेत भोसले म्हणजे टॅलेंटच पावर हाऊस. अनेक कलाकारांची मिमिक्री करण्यात संकेत तरबेज आहे. अभिनेता स्वप्नील जोशी याने डॉक्टर संकेत भोसले चला हवा येऊ द्याच्या मंचावर आला या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि त्याला अभिनेता सयाजी शिंदे यांची मिमिक्री करायचा आग्रह केला. इतकंच नव्हे तर संकेतने सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या आवाजात गाणं देखील गायलं.

चला हवा येऊ द्या च्या मंचावर येऊन झालेला आनंद व्यक्त करताना डॉक्टर संकेत भोसले म्हणाला, "मी स्वतः महाराष्ट्रीयन असल्यामुळे मी आणि माझे कुटुंबीय चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम नियमितपणे बघतो आणि मला हे आवर्जून सांगायला आवडेल की मी आतापर्यंत टीव्हीवर पाहिलेल्या सर्व विनोदी कार्यक्रमांमध्ये हा सगळ्यात उत्तम कार्यक्रम आहे. जेव्हा मला कळलं की, झी कॉमेडी फॅक्टरीच्या निमित्ताने आम्ही सगळे चला हवा येऊ द्या च्या मंचावर जाणार आहोत तेव्हा माझी उत्सुकता शिगेला पोहोचली आणि आम्ही सर्वांनी चला हवा येऊ द्याच्या सेटवर येऊन खूप धमाल केली. चला हवा येऊ द्या मधील सर्व कलाकारांसोबत आमची केमिस्ट्री खूप चांगली जुळली आणि आम्ही अक्षरशः कल्ला केला. स्वप्नील जोशी यांनी मला सयाजी शिंदे यांची मिमिक्री करायला सांगितली आणि मी ते करून सगळ्यांना हसून लोटपोट केलं. झी कॉमेडी फॅक्टरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला चला हवा येऊ द्या मध्ये यायची संधी मिळाली आणि आम्ही खूप धमाल केली. प्रेक्षक आमच्या कार्यक्रमावर देखील असंच प्रेम करतील अशी मला आशा आहे."

बातम्या आणखी आहेत...