आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नपुर्ती:अभिनेत्री सान्या मल्होत्राने गुडगावमध्ये घेतले ड्रीम होम, आलिशान फ्लॅटमधील गृहप्रवेशाचे फोटो केले शेअर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'दंगल' या चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सान्या मल्होत्राची स्वप्नपुर्ती झाली आहे. तिने आपले ड्रीम होम खरेदी केले आहे. गुडगाव येथे तिने 4 बीएचके फ्लॅट खरेदी केला असून नुकताच तिथे तिने गृहप्रवेश केला. स्वतः सान्याने सोशल मीडियावर गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे.

सान्याने शेअर केले गृहप्रवेशाचे फोटो
सान्या लवकरच 'कटहल' या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी तिने दिल्लीतील गुडगाव येथे 4 BHK फ्लॅट खरेदी केला आणि तिथे गृहप्रवेशाची पूजा केली. सोशल मीडियावर एक खास पोस्ट करून तिने तिच्या नव्या घराची एक झलक दाखवत हा बेस्ट क्षण शेअर केला. चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाच्या वर्षाव केला आहे.

सान्या मल्होत्राने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर नव्या घरातील गृहप्रवेश पूजेचे फोटो शेअर करत त्याला 'नया घर' असे कॅप्शन दिले आहे. गृहप्रवेशासाठी सान्याने ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसत पारंपरिक पोशाख केला होता. तिची ‘दंगल’मधील सहकलाकार फातिमा सना शेखने या पोस्टवर ‘लव्ह’ अशीही कमेंट केली आहे.

सान्याचे आगामी चित्रपट
'दंगल'मधील धाकड गर्ल म्हणून सान्याने आपली ओळख निर्माण केली. या हिट चित्रपटानंतर सान्याला मोठी प्रसिद्धी मिळाली. 'दंगल' नंतर ती सिक्रेट सुपरस्टार, बधाई हो, पगलेट, मीनाक्षी सुंदरेश्वर, लव्ह होस्टेल, हीट या चित्रपटांत झळकली आहे. लवकरच ती कटहल या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 19 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ती मेघना गुलजार दिग्दर्शित 'सॅम बहादूर' या चित्रपटात अभिनेता विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.