आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्रीचा डान्स VIDEO:सान्या मल्होत्राने 'काली काली आंखे'वर केला दमदार डान्स

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री सान्या मल्होत्राने 'बाजीगर' चित्रपटातील 'ये काली काली आंखे' या गाण्यावर एक दमदार डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, सान्या गाण्याच्या बीट्सवर तिच्या हाय एनर्जी स्टेप्सचा आनंद घेताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत सान्याने कॅप्शनमध्ये लिहिले - जर तुम्ही 90 च्या दशकातील ओरिजिनल किड असाल तर तुम्ही या गाण्यावर डान्स करण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाहीत. फॉरेव्हर फॅन गर्ल अलर्ट!

चाहत्यांना सान्याचा डान्स मूव्ह आवडला
सोशल मीडियावर यूजर्स सान्याच्या या धमाकेदार डान्स, एनर्जी आणि एक्सप्रेशनचं कौतुक करत आहेत. सान्याने गाण्याच्या बीट आणि बोलानुसार उत्कृष्ट कोरिओग्राफी केली आहे.

गाण्याच्या शेवटच्या भागात सान्या 'हिरणी जैसी चाल' या ओळीवर हरणाप्रमाणे उड्या मारत मजा घेताना दिसत आहे. तिच्या या डान्स व्हिडिओला सोशल मीडियावर चांगलीच पसंती दिली जात आहे.

एका युजरने त्यावर कमेंट केली – शेवटच्या 'हिरणी जैसी चाल' मूव्हसाठी 100/100 ! ..तर एका युजरने लिहिले – मी हा व्हिडिओ फक्त तुझ्या 'हिरणी जैसी चाल' स्टेपसाठी पाहिला.

सान्या 'सॅम बहादूर'मध्ये दिसणार
'बाजीगर' चित्रपटातील या गाण्यावर शाहरुख खान आणि काजोलने डान्स केला होता. सान्या मल्होत्रा ​​लवकरच 'सॅम बहादूर'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट दिवंगत फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात सान्यासोबत विकी कौशल आणि फातिमा सना शेख मुख्य भूमिकेत आहेत.

सध्या हा चित्रपट पोस्ट प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. मार्चमध्ये चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. निर्मात्यांनी चित्रपटाची समाप्ती साजरी करण्यासाठी एक पार्टी देखील दिली. हा चित्रपट 1 डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.