आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि ‘बिग बॉस 11’ फेम सपना चौधरी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सपनाच्या भावाच्या पत्नीने तिच्या कुटुंबियांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सपना, तिचा भाऊ कर्ण आणि आई नीलम यांच्याविरुद्ध पलवलच्या महिला पोलिस ठाण्यात हुंड्यासाठी मारहाणीसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीसाठी तिघांनाही पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र अद्याप कुणालाही याप्रकरणी अटक झालेली नाही.
नशेत अनैसर्गिक लैंगिक शोषणाचा आरोप
सपना चौधरीच्या भावावर त्याच्या पत्नीने अनैसर्गिक लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले आहेत. पलवल येथील रहिवासी असलेल्या सपनाच्या वहिनीने महिला पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तिने तक्रारीत म्हटले आहे की, 2018 साली दिल्लीतील नजफगढ येथील रहिवासी सपना चौधरीचा भाऊ कर्ण याच्याशी तिचे लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून तिचा हुंड्यासाठी छळ केला जात होता आणि तिला अनेकदा मारहाणही केली जात होती.
क्रेटा कारसाठी छळ
मुलगी झाल्यानंतर सासरच्यांनी मुलीसाठी झालेल्या कार्यक्रमात क्रेटा कारची मागणी केली. तिच्या वडिलांनी 3 लाख रुपये रोख आणि सोने-चांदी, कपडे दिले, मात्र तरीही तिच्या सासरच्यांनी हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने क्रेटा कार आणण्यासाठी तिचा छळ सुरू केला.
सपनाच्या वहिनीने असाही आरोप केला आहे की, 26 मे 2020 रोजी तिच्या पतीने दारूच्या नशेत तिच्यावर अत्याचार केला आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवले. दरम्यान सहा महिन्यांपूर्वी ती तिच्या माहेरी पलवल येथे आली आहे.
अजामीनपात्र कलमांअंतर्गत एफ.आय.आर
चौकशीनंतर सपना चौधरी, करण, नीलम यांच्या विरोधात पलवल महिला पोलिस ठाण्यात कलम भांदवी कलम 498ए, 377, 406, 323, 506, 34 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना डीएसपी सतेंद्र कुमार यांनी चौकशीसाठी महिला पोलिस ठाण्यात बोलावले होते. यावेळी आरोपी आणि पीडित पक्षाचे वकीलही उपस्थित होते. डीएसपींनी प्रकरणाशी संबंधित प्रत्येक बाबींची चौकशी केली. या प्रकरणी आतापर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.
सपना चौधरी ही हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आहे. ती ‘बिग बॉस 11’ मध्ये दिसली होती. जिथे तिने तिच्या आयुष्यातील अनेक गुपितं उघड केली होती. वडिलांच्या निधनानंतर तिने घराची जबाबदारी सांभाळली आणि ती डान्स स्टेज शो करू लागली. यानंतर ती काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम साँग करताना दिसली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.