आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साराने सुशांतसोबतचे नाते का तोडले:अभिनेत्रीचा दावा - सुशांतने विश्वासघात केल्याने ब्रेकअप केले होते, जेव्हा रिलेशनशिपमध्ये होती तेव्हा त्याच्या घरी राहायला गेली होती

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत 'केदारनाथ' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जवळ आले होते.

सारा अली खानने शनिवारी एनसीबीच्या चौकशीत एक मोठा खुलासा केल्याचा दावा केला जातोय. तिने सांगितल्यानुसार, सुशांतने प्रेमात विश्वासघात केल्याने तिने त्याच्यासोबतचे नाते संपुष्टात आणले होते. साराने तपास यंत्रणेला सांगितले की, 'केदारनाथ' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र त्याच्या काही महिन्यांनी म्हणजे जानेवारी 2019 मध्ये दोघे वेगळे झाले.

  • सारा सुशांतच्या घरी राहायला गेली होती

रिपोर्ट्सनुसार, साराने एनसीबीला सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात ती सुशांतच्या कॅपरी हाऊस येथील घरी त्याच्यासोबत राहायला गेली होती. तिच्या म्हणण्यानुसार, ती सुशांतबरोबर 5 दिवस थायलंडच्या कोह सॅम्यूई बेटावर गेली होती, तेथे तिने त्याच्यासोबत पार्टी देखील केली होती.

चौकशीदरम्यान साराने सुशांत 'केदारनाथ'च्या शूटिंगदरम्यान ड्रग्स घेत होता, असे एनसीबीला सांगितले. साराने सांगितल्यानुसार, ती सुशांतबरोबर त्याच्या पार्ट्यांमध्ये सहभागी व्हायची, मात्र स्वतः कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही.

  • सुशांत साराला प्रपोज करणार होता

काही दिवसांपूर्वी सुशांत सिंह राजपूतच्या लोणावळ्यास्थित फार्महाऊसचा केअर टेकर असलेल्या रईसने दावा केला होता की, दिवंगत अभिनेता सारा अली खानला प्रपोज करणार होता. रईस सप्टेंबर 2018 पासून ते सुशांतच्या मृत्यूपर्यंत लोणावळा येथील फार्महाऊसवर केअर टेकर म्हणून काम करत होता.

आयएएनएसशी बोलताना त्याने सांगितले की, 2018 पासून सारा मॅडमनी सुशांत सरांसोबत फार्महाऊसवर यायला सुरुवात केली होती. जेव्हा त्या यायच्या तेव्हा तीन ते चार दिवस तेथे मुक्काम करायच्या. डिसेंबर 2018 मध्ये थायलंड ट्रिपहून परतल्यानंतर हे दोघे विमानतळावरुन थेट फार्महाऊसवर आले होते. रात्री 10 ते 11च्या दरम्यान दोघे पोहोचले होते. आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र देखील होते’

रईस पुढे म्हणाला, 'मला आठवतेय की अब्बास भाई (सुशांतचा मित्र) यांनी जानेवारी 2019 मध्ये सुशांत सरांच्या वाढदिवशी दमण ट्रिपला जाण्यासाठी तयारी करण्यास सांगितले होते. मात्र फेब्रुवारीच्या जवळपास दमणमध्ये पंतप्रधानांचा दौरा होता. त्यामुळे तेथील सर्व हॉटेल फूल होते आणि आम्हाला हॉटेलची रुम मिळाली नाही. त्यामुळे ती ट्रिप रद्द झाली होती.'

रईसने पुढे सागितल्यानुसार, 'सुशांत सर दमण ट्रिपच्यावेळी साराला प्रपोज करण्याचा विचार करत होते. त्यांना सराला गिफ्ट द्यायचे होते आणि त्यांनी तिच्यासाठी काही तरी ऑर्डरपण केले होते. पण ट्रिप रद्द झाली. त्यानंतर केरळला जाण्यासाठी ट्रिप आयोजित केली. पण ती देखील रद्द झाली. नंतर 2019 च्या फेब्रुवारी-मार्च दरम्यान दोघांचे ब्रेकअप झाल्याचे मी ऐकले. सारा मॅडम जानेवारी 2019 नंतर फार्महाऊसवर आल्या नाहीत.'

बातम्या आणखी आहेत...