आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतचा शेवटचा चित्रपट:सारा अली खानने केला वडील सैफ अली खान आणि सुशांत यांच्यातील साम्य असणा-या गोष्टींचा खुलासा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सारा अली खानने लिहिले, तुमच्या दोघांमध्ये ही एक गोष्ट समान होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' 24 जुलै रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात सुशांत सिंह राजपूत आणि संजना सांघी यांच्यासह अभिनेता सैफ अली खानने देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बघून सैफची मुलगी सारा अली खानने हिने सुशांतसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिचे वडील आणि सुशांत यांच्यात कोणकोणत्या गोष्टींचे साम्य आहे, हे सांगितले आहे.

शुक्रवारी सारा अली खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सुशांत आणि सैफची 'दिल बेचारा' या चित्रपटाच्या सेटवरची काही छायाचित्रे शेअर केली आहे. यासह साराने लिहिले की, “केवळ या दोन पुरुषांनी माझ्याशी सार्टर (फ्रेंच फिलोसोफर), वॅनघोष (डच पेंटर), टेलिस्कोप, तारामंडल,गिटार, नॉर्दन लाइट्स, क्रिकेट, पिंक फ्लॉयड (इंग्लिश रॉक बॅण्ड), नुसरत साहू आणि अभिनयातील काही कंगोरे याविषयीवर चर्चा केली. तुमच्या दोघांमध्ये ही एक गोष्ट समान होती. दिल बेचारा आता डिस्ने प्लस हॉटस्टारवर”, अशी पोस्ट साराने लिहिली आहे.

  • प्रेक्षकांना पसंत पडला सैफचा कॅमिओ रोल

या चित्रपटात सैफची काही मिनिटांची भूमिका आहे. यात त्याने गीतकार अभिमन्यू वीरची भूमिका वठवली आहे. त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे.

  • साराचा पहिला चित्रपट सुशांतसोबत होता

सारा अली खानने 2017 मध्ये 'केदारनाथ' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. आपल्या पहिल्या चित्रपटात तिने सुशांतसोबत काम केले होते. सुशांत आणि साराच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली होती.

View this post on Instagram

Sushant Singh Rajput ❤️💔❣️

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on Jun 14, 2020 at 8:36am PDT